त्यामुळे त्याने स्वत:च्या पत्नीचे संपविले आयुष्य

विजय लोहार 
Friday, 4 September 2020

नवी मुंबई येथील कोपरखैरणे येथील सेक्टर आठ मध्ये संदीप डोंगरे हा पत्नी व मुलासह राहात होता

नेर्ले (सांगली) : जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात भाटवाडी येथील युवकाने नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहत्या घरी पत्नीच्या डोक्यात बांबू घालुन तिचा खुन केला असल्याची माहिती कासेगाव पोलिसांना स्वतःहून  दिली. ही घटना  (2) बुधवारी रात्री घडली. (3) गुरुवारी  रात्री कासेगाव पोलिसात आरोपी संदीप तानाजी डोंगरे (वय ३८) याने माहिती दिली .तर सौ.मनीषा संदीप डोंगरे(वय ३०) असे मृत पत्नीचे नाव आहे.त्याने पत्नीच्या अनैतिक संबंध व मुलास मारहाण करीत असल्याच्या रागातून डोक्यात बांबू घालून खून केला.

पोलिसाकडुन मिळालेली माहिती अशी,

नवी मुंबई येथील कोपरखैरणे येथील सेक्टर आठ मध्ये संदीप डोंगरे हा पत्नी व मुलासह राहात होता.संदीप डोंगरे याच्या माहितीनुसार त्याने पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध होते तसेच ती माझ्या बारा वर्षाच्या मुलाला सातत्याने मारहाण करत असल्याच्या कारणातून व रागातून तिच्या डोक्यात बांबूने मारहाण केली असल्याचे सांगितले. मी तिला संपवून गावाकडे आल्याचे सांगितले.घटनेची माहिती मिळताच खात्री करण्यासाठी कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी तातडीने नवी मुंबई येथील कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक श्री.विश्वकर यांना संपर्क करून माहिती दिली.

हेही वाचा-  कागलमध्ये या कालावधित राहणार कडक जनता कर्फ्यू

यावेळी मुंबईस्थित कोपरखैरणे पोलिसांनी तातडीने संदीप डोंगरे राहत असलेल्या कोपरखैरणे भागातील सेक्टर ८मधील घराकडे धाव घेतली.घराला कुलूप होते. कुलूप तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला.यावेळी किचनमध्ये संदीप डोंगरे याची पत्नी सौ. मनिषा संदीप डोंगरे (वय 30) रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.ती मयत झाली होती.कोपरखैरणे पोलीसानी कासेगाव पोलीस ठाण्यात येत आरोपी संदीप डोंगरे याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या मुलासही सोबत नेले. याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case by stabbing his wife in the head at his residence in Kopar Khairane Navi Mumbai