esakal | सावधान ; विनापास या जिल्ह्यात प्रवेश करताय! होणार गुन्हा दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

case will be registered If you enter Belgaum district without pass

आंतरराज्य प्रवासासाठी सेवासिंधू ऑनलाईन प्रणाली विकसीत केली आहे. अर्जांची छानणी करून ऑनलाईन पास (ई-पास) मिळत आहे.

सावधान ; विनापास या जिल्ह्यात प्रवेश करताय! होणार गुन्हा दाखल 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - पासविना कर्नाटकात घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या 38 जणांचा डाव गेल्या आठवड्यात हाणून पाडला. पण, त्यानंतरही पासविना जिल्ह्यात काही लोक दाखल झाल्याचे आणि काही जण प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे याची गंभीर दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली आहे. कठोर कारवाईचे संकेत दिले. जिल्ह्यात बेकायदा प्रवेश करणाऱ्यांच्या विरोधामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिला आहे. 

आंतरराज्य प्रवासासाठी सेवासिंधू ऑनलाईन प्रणाली विकसीत केली आहे. अर्जांची छानणी करून ऑनलाईन पास (ई-पास) मिळत आहे. पण, विनापास काही लोक कर्नाटकाच्या हद्दीत आले आहेत. काही लोक येण्याच्या तयारीत आहेत. विनापरवानगी सीमारेषा ओलांडणे लॉकडाऊन कालावधीत गुन्हा आहे. त्यासाठी या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. तसेच ज्यांनी नियमबाह्य व पासविना बेळगावात प्रवेश केला आहे. त्यांनी माहिती द्यावी. वैद्यकीय तपासणीला स्वतःहून पुढे यावे. अखत्यारितील पोलिस ठाण्यालाही कल्पना द्यावी. एखाद्यावेळी स्वतःहून पुढे न आल्यास आणि चौकशीमध्ये परवानगी न घेता कर्नाटकाची सीमा ओलांडली असल्याचे स्पष्ट झाल्यास फौजदारी गुन्हा नोंदविला जाईल, असा ईशारा बोम्मनहळ्ळी यांनी दिला आहे. 

हे पण वाचा - कोल्हापुरात परप्रांतिय कामगारांचा उद्रेक, शेकडो कामगार रस्त्यावर
 

माहितीसाठी संपर्क क्रमांक जाहीर 

परराज्यातून आपल्या भागात एखादी व्यक्ती आली आहे आणि क्वारंटाईन प्रक्रियेला सामोर गेली नसल्यास त्याबाबतची माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी कंट्रोल रुमची (0831-2407290) स्थापना केली आहे. त्यावर संपर्क साधण्याबाबत कळविले आहे. 

हे पण वाचा -  नवीन शैक्षणिक वर्ष नक्की कधी ? 

go to top