कोल्हापूर शहर परिसरात सामाजिक उपक्रमांनी शिवजयंती साजरी...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिव शाहू मर्दानी आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष अमोल बुचडे व त्यांच्या खेळाडूंनी रांगोळी रेखाटली होती. महापौर आजरेकर यांच्या हस्ते शिवजन्म काळ सोहळा झाल्यानंतर पुतळ्याचे पूजन झाले.

कोल्हापूर - सामाजिक उपक्रमांनी शहर परिसरात शिवजयंती आज साजरी झाली. कोरोनाच्या संचारबंदीमुळे सोशल डिस्टन्स ठेवून शिवप्रतिमेचे पूजन झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महापौर निलोफर आजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव जन्मकाळ सोहळा झाला. त्यांच्याच हस्ते पुतळ्याचे पूजन झाले. जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय या जयघोषाने‌ परिसर दणाणून गेला. शिवप्रेमींनी घरोघरी शिवप्रतिमेचे पूजन करत 'शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात,'चा प्रत्यय दिला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिव शाहू मर्दानी आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष अमोल बुचडे व त्यांच्या खेळाडूंनी रांगोळी रेखाटली होती. महापौर आजरेकर यांच्या हस्ते शिवजन्म काळ सोहळा झाल्यानंतर पुतळ्याचे पूजन झाले. या वेळी आमदार चंद्रकांत जाधव, पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, नगरसेवक ईश्‍वर परमार, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत साळोखे उपस्थित होते.

वाचा - तुम्हाला फोन येईल ; माहिती द्या नाहीतर कारवाईला सामोरे जा.... 

संयुक्त जुना बुधवार सेवाभावी संस्थेतर्फे वतीने आज पारंपरिक शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष धनंजय सावंत व माजी उपमहापौर दिगंबर फराकटे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन झाले. परिसरात भव्य आकाराची रांगोळी साकारण्यात आली. घरोघरी भगवे झेंडे लावण्यात आले. प्रत्येक घरात शिवजयंती फेसबुक लाइव्हद्वारे साजरी करण्यात आली‌‌. कोरोनाबद्दल जागृती व घरी राहण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी सचिव सुशील भांदिगरे, उपाध्यक्ष संजय पाटील, अनिल निकम, नागेश घोरपडे, नामदेव आवटे, संदीप राणे, अमोल डांगे, महावीर पोवार, उदय भोसले, संदीप देसाई, सुशांत महाडिक, महेश शिंदे, राहुल घाडगे, कपिल नाले, राजू कुंडले, सुनील शिंदे, रमेश गवळी उपस्थित होते.

संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीतर्फे ऑनलाईन पाळणा व जन्मकाळ सोहळा झाला. शंभर ते सव्वाशे महिलांनी भाग घेतला. प्रत्येकीने आपापल्या घरी शिवप्रतिमा पूजन करून एकाच वेळी पाळणा म्हणून सुंठवडा वाटपाचा कार्यक्रम घरी केला. वनिता ढवळे, पूजा शिराळकर, श्रद्धा लाड, सेजल मोरे, सुमित्रा चौधरी, सुप्रिया नलवडे, जयंती कणसे, भाग्यरेखा पाटील, सविता अतिग्रे, उषा निंबाळकर, ऐश्वर्या भोसले, लावण्य नलवडे, आर्या ढवळे,
ऐश्वर्या कणसे, विजया भोसले, उषा निंबाळकर, रेवा पाटील, शामल कदम, ऋतूजा भोगटे, सारीका जाधव, अमृता तोडकर,‌ राजश्री ढवळे, मयुरी सोनवणे
रिदधी मगदूम, रूपाली पोळ, सलोनीआप्टेकर, अश्विनी पाटील, मीनाश्री मोरे, पूनम यादव, हेमलता भोसले उपस्थित होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrate Shiv Jayanti with social activities in Kolhapur city area