
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार..
जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : केंद्रीय औदयोगिक सुरक्षा दलात कार्यरत असणारे पोहाळे तर्फ आळते ता.पन्हाळा येथील पोलीस जवान नितीन विष्णू मोरे (वय २५ ) यांने झारखंड येथील रांची जिल्हयात पंखाला दोरी अडखून गळफास घेऊन आत्महत्या केली. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. याची माहिती गावात दोन दिवसापूर्वी आली. आज सकाळी त्याच्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान,आज सकाळी आठ वाजता रांचीहून नितीनचे पार्थीव घेऊन ॲब्युलन्स पोहाळे येथे आली. यावेळी मृत्युचे कारण स्पष्ट नसल्याने पार्थीव ताब्यात घेण्यात कुंटुबांनी नकार दिला. परंतु त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी होण्यासाठी तातडीने पाठपुरावा करण्याची ग्वाही पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी पार्थीव ताब्यात घेतले.यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, शाहुवाडी पन्हाळा विभागाचे पोलीस उपधिक्षक अनिल कदम, कोडोली पोलिस ठाण्याचे साय्यक पोलीय निरीक्षक सुरज बनसोडे उपस्थित होते.
हेही वाचा- राजाराम बंधाऱ्यावरून चारचाकी थेट नदीत ; दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव -
फुलांनी सजवलेल्या टॅक्टर टाॅलीमध्ये पार्थीव ठेवून गावातून मिरवणूक काढली. नविन वसाहत मध्ये त्याच्या पार्थीवावर सरपंच दादासो तावडे, महसूल विभागातर्फै तलाठी सुवर्णा कराड पुष्पचक्र अर्पण केले तसेच पोलीसांनी मानवंदना दिली. मोरे हा गेल्या चार वर्षापासून केंद्रीय औदयगिक सुरक्षा दलात कार्यरत होता. तो एकलुता एक होता. त्याच्या मागे आई वडील लहान बहिन असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी ता.6 रोजी आहे. आज रांची येथून पार्थीव घेऊन आलेल्या पोलीसांनी नितीनच्या आईवडीलांची भेट घेऊन या घटनेची चौकशी करुन मदत करण्याचे आश्वासन दिले.
संपादन - अर्चना बनगे