आला फेरा गेला फेरा अन् चिकनचा बाजार परत सजला..

Chicken sales are on the rise in belgum
Chicken sales are on the rise in belgum
Updated on

बेळगाव - कोरोना हा चिकनने होतो या अफवेमुळे मार्च व एप्रिल महिन्यात चिकन खाणाऱ्यांमध्ये चांगलीच घट झाली होती. त्यामुळे चिकनच्या दरात मोठ्या प्रामाणात घसरण झाली. शंभर रुपयांना तीन ते चार जीवंत कोंबड्या विकण्याची वेळ चिकन विक्रेत्यांवर आली होती. मात्र, सध्या या व्यवसायाला अच्छे दिन येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शहरात सध्या प्रति किलो 210 रुपयांनी चिकनची विक्री केली जात आहे. तरीही खरेदीसाठी चिकन दुकानात खवय्यांची गर्दी होताना दिसत आहे. पक्षांची कमतरता असल्याने दरात अजून वाढ होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चिकनबद्दल अनेक अफवा पसरविण्यात आल्या होत्या. यामुळे चिकन घेण्यास कोणीही तयार नव्हते. परिणामी चिकन विक्रेत्यांनी दर कमी करून जीवंत कोंबड्यांची विक्री केली. यामुळे त्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे कोट्याधींची उलाढाल थंडावली. अफवा कमी झाल्यानंतर चिकन खाणाऱ्यांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. लॉकडाऊनपूर्वी सुमारे 150 रुपयांना चिकनची विक्री केली जात होती. सध्या 210 प्रति किलो चिकन विक्री केले जात आहे.

देशभरात 17 मे पर्यंत लॉकडाऊन असले तरी बेळगाव शहरात लॉकडाऊनमध्ये शितीलता देण्यात आली आहे. शहरात पागुल गल्ली, काकतीवेस, वडगाव शहापूर या भागात सुमारे 200 हून अधिक चिकनची दुकाने आहेत. यामुळे शहरातील बहुतांशी चिकन विक्रीची दुकाने सुरु झाली आहेत. मात्र, बेळगाव, खानापूर तालुक्‍यातील पोल्ट्री व्यवसाय पूर्णपणे थंडावला आहे. या भागातील पोल्ट्रीमध्ये एकही कोंबडी नाही. यामुळे चिकन दुकानदारांना निपाणी, पाचापूर, अंकलगी, गोकाक आदी भागातून जीवंत कोंबड्या आणाव्या लागत आहेत. लॉकडाऊनमुळे गेले काही दिवस कुकुटपालनाचे शेड रिकामे होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने व चिकनला पुन्हा अच्छे दिन येत असल्याने कुकुटपालन व्यवसायिक कंपनीकडे पक्षांसाठी मागणी करताना दिसत आहेत. यामुळे शेडमध्ये पुन्हा कोंबड्यांची कुककुक ऐकायला मिळणार आहे.

शहरातील चिकनची बहुतांशी दुकाने सुरु झाली आहेत. सध्या 210 रुपये प्रति किलो चिकनचा दर आहे. बेळगाव व खानापूर तालुक्‍यातील कुकुटपालन शेड बंदच आहेत. यामुळे निपाणी परिसरातून जीवंत कोंबडी आणाव्या लागत आहेत. यानंतर दर वाढण्याची शक्‍यता आहे.
- प्रशांत भादवणकर, चिकन विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com