शाळा लवकर सुरू होणे कठीणच ; संसर्ग दूर होणे काळाची गरज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

दरवर्षी जुन महिना येताच शाळा गजबजलेल्या दिसुन येतात यावेळी मात्र सर्व शाळांसमोर निरव शांतता दिसुन येतेय...

बेळगाव - कोरोनाच्या संकटामुळे शाळा लवकर सुरु होणार नाहीत याबाबतचे चित्र स्पष्ट होत असुन जुलै महिन्यात शाळा सुरु होणार नाहीत यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. मात्र जुलै महिन्यानंतर पुढे काय हा प्रश्‍न कायम असणार आहे. त्यामुळे 2020-21 च्या शैक्षणिक वर्षावर मोठा परीणाम होणार असल्याने सर्वच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे कोरानाचा संसर्ग कमी होणे ही शैक्षणिक दृष्टाही काळाची गरज बनली आहे.

दरवर्षी जुन महिना येताच शाळा गजबजलेल्या दिसुन येतात यावेळी मात्र सर्व शाळांसमोर निरव शांतता दिसुन येत असुन केंद्र सरकारने अनलॉक दोनमध्येही शाळा, महाविद्यालये बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच देशभरात कोरोनाचे महाभयंकर संकट निर्माण झाले आहे त्यामुळे सर्वच जण कोरोनाच्या भिती खाली वावरत आहेत अशा वेळी शाळा सुरु करु नका अशी भुमिका पालकांनी घेतली आहे. मात्र किती दिवस शाळा बंद राहणार याची चिंताही पालकांना लागुन राहिली आहे. वेळेत शाळा सुरु झाल्या नाहीत तर वार्षिक अभ्यासक्रम पुर्ण होणार नाही. त्यामुळे जितके दिवस शाळा बंद राहतील त्याप्रमाणे अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचेच मोठे नुकसान हो

वाचा - काय सांगताय ! चक्क आपल्या 'लाल परीत' वाहिले जात आहेत 'हे' दगड...

जुलै नंतर शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे मात्र त्या काळात राज्यात कोरानाच्या रुग्णात वाढ होण्याची शक्‍यता आहे त्यामुळे कोरोनाच्या संकटात शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न कायम राहणार आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये शाळा सुरु होणार का हे येणार काळच ठरविणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याला, ऑनलाईन शिक्षणावर भर द्यावा लागणार असला आहे.

 

शाळा लवकर सुरु होणार नाहीत याची जाणीव आहे. मात्र विद्यार्थ्यांसाठी पर्यायी उपाय शोधला पाहिजे विद्यार्थी अधिक दिवस शाळेपासुन दुर राहिले तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. ज्या भागात संसर्ग कमी आहे तेथील शाळा सुरक्षेच्या उपाय योजनांसह सुरु करण्याबाबत विचार झाला पाहिजे
- राजन सुतार, पालक
 

शाळा सुरु होण्यास विलंब झाला तरी शिक्षण खात्याकडुन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दखल घेतली जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करुनच शाळा सुरु केल्या जाणार आहेत. त्यामुळे शाळा सुरु कधी सुरु होतील हे आताच सांगता येत नाही
- ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: clear that schools will not start soon because of the Corona crisis