बंगळूरुतुन ते निघाले राजस्थानाला पायी कापले ६०० कि. मी. अंतर अन् मधेच...

The condition of the family is due to traffic closure along the Maharashtra-Karnataka border
The condition of the family is due to traffic closure along the Maharashtra-Karnataka border
Updated on

कोगनोळी - बंगळूर येथे वास्तव्यास असणाऱ्या राजस्थानमधील वीट व्यावसायातील मजूर कुटुंबावर लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ आली. त्यामुळे काहीही करून गावाकडे जाण्याची ओढ लागली. त्यातून बंगळूर-कोगनोळी हे तब्बल ६०० किलो मीटर अंतर बावीस दिवसात पायी कापले. येथे आल्यावर पोलिसांनी त्यांची सोय स्तवनिधी नजीकच्या मोरारजी देसाई शाळेत केली.

राजस्थानमधील बबलू (वय ५०), पत्नी लमारोशी (वय ४६), मुली मारुशी (वय १६), (खुशी वय ७) हे बंगळूर येथे वीट व्यावसायिक मजूर म्हणून काम करतात. गेल्या महिन्यापासून काम बंद असल्याने पैशाअभावी रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे सहकुटुंब गावी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र वाहन न मिळाल्याने नाईलाजाने किरकोळ साहित्य सोबत घेऊन पायीच निघाले. लॉकडाउनमुळे वाटेत खाणे-पिणेही मुश्किल झाले. मात्र पोलिसांनी माणुसकी दाखवत चहा, नाष्टयाची सोय जागोजागी केली. बावीस दिवसानंतर कोगनोळी येथे पोहोचल्यावर महाराष्ट्र पोलिसांनी तपासणी नाक्यावर अडवून कर्नाटक पोलिसांकडे सुपूर्द केले. कर्नाटक पोलिसांनी त्यांची विचारपूस करून जेवण व इतर सोय केली. आधाराची गरज असल्याने कोगनोळीतील कदम मेडिकलचे मालक विष्णू कदम यांनी औषधे व एनर्जी पेय दिले. योगेश चौगुले यांनी जेवणाची सोय केली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेसह वाहतूक बंद असल्याने या कुटुंबाचे हाल थांबविण्यासाठी निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांनी तवंदीनजीकच्या मोरारजी देसाई शाळेत ठेवून त्यांची सोय केली.

'अचानक काम बंद झाले. आपल्याजवळचे पैसेही संपल्याने खायचे काय याचा प्रश्न पडला. त्यामुळे पायीच गावी जाण्याचा निर्णय घेतला.'
- बबलू, विट मजूर, राजस्थान
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com