इचलकरंजीकरांना दिलासा ः कोरोना बाधीतांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतेय

 Consolation to Ichalkaranjikar: The number of patients recovering from corona is increasing
Consolation to Ichalkaranjikar: The number of patients recovering from corona is increasing
Updated on

इचलकरंजी ( कोल्हापूर) : गेल्या अनेक दिवसानंतर आज कांहीसा दिलासा मिळाला. नव्या बाधीत रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज नवे 38 कोरोना रुग्ण आढळले. तर दिवसभरात 54 रुग्ण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, आणखी दोघांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. 
अनेक दिवस सरासरी 50 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत होते. पण गेली दोन दिवस रुग्ण संख्येत कांही अशी घट झाली आहे. आज नव्या बाधीत रुग्णांपेक्षा कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे इचलकरंजीकरांना थोडा दिलासा मिळला आहे. 
आज विविध 26 भागात 36 नवे रुग्ण आढळले आहेत. सोलगे मळ्यात एकाच कुटूंबांतील चौघे बाधीत झाले आहेत. ठाकरे चौक, मंगळवार पेठ, हनुमाननगर, इंदिरा कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, वंदे मातरम क्रिडांगण या परिसरात आजही कोरोनाचे नविन रुग्ण आढळले. आण्णा रामगोंडा शाळेजवळील 72 वर्षीय महिला व जवाहरनगर परिट गल्लीतील 52 वर्षीय पुरुष असे दोन रुग्ण आज दगावले. एकूण दगावलेल्या रुग्णांची संख्या 93 वर पोहचली आहे. आतापर्यंत 797 रुग्ण बरे झाले आहेत. 1050 ऍक्‍टीव्ह रुग्ण आहेत. एकूण रुग्ण संख्या 1950 इतकी झाली आहे. 

खासगी रुग्णालय आरक्षीत, बेडबाबत आढावा बैठक 
एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये आणि जिवितहानी होवू नये, यासाठी विशेष दक्षता घ्या, अशी सुचना मुख्याधिकारी दिपक पाटील यांनी केली. शहरातील 32 खासगी रुग्णालयातील 80 बेड राखीव ठेवले आहेत. त्यांनी बैठक घेवून आढावा घेतला. रुग्णालयांना रोज भेटी देवून उपलब्ध बेडची माहिती दर्शनी फलकावर नमूद करण्याबाबत लक्ष देण्याची सुचना केली. बेड समन्वयक अधिकारी केतन गुजर, लेखापाल कलावती मिसाळ, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, लेखा परिक्षक नितीन सलगर उपस्थित होते. 

तीन ठिकाणी होणार रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट 

शहरात आयजीएम रुग्णालयात रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट केली जात होती. आता आणखी तीन ठिकाणी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये डीकेटीई कोविड केअर सेंटर, तांबे माल व लालनगर येथील नागरी आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे संशयीत रुग्णाचे तातडीने निदान व उपचार होण्यास मदत होणार आहे. 
- संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com