
कोल्हापूर : जिल्ह्यातील 1025 पैकी 938 गावांत कोरोनाने धडक दिली आहे. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा शिरोळ तालुका पूर्णपणे बाधित झाला आहे. शिरोळमधील सर्व 52 गावांत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, तर हातकणंगले, कागल, गगनबावडा हे तालुके पूर्णपणे बाधित होण्याच्या उंबरठ्यावर आहे. मागील तीन महिन्यांत कोरोनाने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात धडक दिली.
शाहूवाडी, राधानगरी, चंदगड या डोंगराळ भागातील गावातही कोरोना पोहोचला. जिल्ह्यातील केवळ 87 गावे ही कोरोनापासून सध्या तरी दूर आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांत ग्रामीण भागातील रुग्ण 50 टक्के आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरुवातीच्या टप्प्यात शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण सापडले. पुढे मात्र सर्वच तालुक्यातून कोरोना बाधित रुग्णांची मालिका सुरु झाली.
जवळपास 360 गावे या पाचपेक्षा कमी कोरोना रुग्ण असलेली आहेत, तर 565 पेक्षा अधिक गावे पाचपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. करवीर व हातकणंगले हे मोठे तालुके पूर्णपणे बाधित होत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढू नये, यासाठी कंटेन्मेंट झोन केले असले तरी त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे चित्र आहे. कंटेन्मेंट झोनचा कालावधी संपल्यानंतरही ग्रामीण भागात 6 हजारपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय रुग्ण संख्या अशी :
तालुका एकूण गावे बाधित गावे बाधित नसलेली गावे
*शिरोळ 52 52 0
*करवीर 118 112 6
*हातकणंगले 60 59 1
*राधानगरी 98 88 10
*कागल 83 78 5
*गगनबावडा 29 24 5
*पन्हाळा 111 102 9
*शाहूवाडी 106 98 11
*आजरा 73 65 8
*गडहिंग्लज 89 80 9
*चंदगड 109 98 11
*भुदरगड 97 85 12
----------------------------------------------------------------
एकूण 1025 938 87
ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण हे शहराप्रमाणेच वाढले आहेत. परजिल्ह्यातून किंवा रेड झोनमधून येणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक असल्यानेच ही रुग्णसंख्या वाढली आहे. सध्या कोरोनाच कहर कमी येत असून लोकांनी मास्कचा वापर करणे, सॅनिटायझर वापर करणे व सामाजिक अंतर ठेवणे अत्यावश्यक आहे.
- डॉ.योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.