दख्खनच्या राजाचे मंदिर पाच महिन्यापासून बंद ; डोंगरावरील नागरिकांवर उपासमारीची वेळ 

corona effect on jyotiba hill people
corona effect on jyotiba hill people

जोतिबा डोंगर - दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचे मंदिर कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. येथील ग्रामस्थांचा उदरनिर्वाह मंदिरावर अवलंबून आहे. 
यंदा एप्रिल महिन्यात होणारी चैत्र यात्रा व श्रावणात होणारी श्रावण षष्ठी यात्राही रद्द झाली आहे. परिणामी अनेक अडीअडचणींचा सामना येथील ग्रामस्थ पूजारांना करावा लागला आहे सध्या तर येथील जनजीवन फार विस्कळीत झाले असून उदरनिर्वाहासाठी धडपड करावी लागत आहे. 

जोतिबा हे प्राचीन  तीर्थक्षेत्र असून महाराष्ट्र कर्नाटक आंध्रप्रदेश गुजरात या राज्यातील असंख्य भाविकांचे कुलदैवत आहे. याठिकाणी दरवर्षी ८० ते ९० लाख भाविक भेट देतात. देवपूजा, देवता कृत्य व भाविकांचे आद्रातिरर्थ यावरच गुरव समाज अवलंबून आहे. येथे ९० टक्के लोक हे गुरव समाजाचे आहेत. गुरव समाज व भाविकांचं ऋणानुबंध हे पिढ्या अन् पिढ्या पासून टिकून आहेत. डोंगरावर आलेला भक्त कधी उपाशी जात नाही. पूरणपोळी खावूनच ते डोंगर  उतरतात.

याठिकाणी गुलाल-खोबरे दवणा मेवामिठाई यांची बाजारपेठ आहे. भाविकांसाठी हॉटेल  चहा नाष्टा सेंटर आहेत. १५ मार्च पासून जोतिबाचे मंदिर कोरोनाच्या संसर्गामुळे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतला. एरवी जोतिबाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात दुमदुंमणारा जोतिबा डोंगर एकदमच शांत झाला. तो आजतागायत शांत झाला आहे. गेल्या शंभर वर्षापासून जोतिबा डोंगरावर कधी ही न आलेले संकट या कोरोनाच्या निमित्ताने आले. कधीही न पाहिलेली भयान शांतता जोतिबाच्या ग्रामस्थांनी पाहिली.

वाढत्या कोरोना संसर्गाचा परिणाम दिवसेंदिवस येथील जनजीवनावर होत असून  यंदा यात्रा रद्द झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे  हाल होत आहे. दुकानदार व्यापाऱ्यांनाही मोठी झळ बसली आहे. एकूणच कोरोनाच्या परिणामुळे जोतिबा डोंगरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना केव्हा जाणार.. मंदिर कधी सुरू होणार या प्रतिक्षेत येथील ग्रामस्थ आहेत.

यंदा कोरोनामुळे जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रा, श्रावण षष्ठी यात्रा झाली नाही. याचा परिणाम डोंगरावरील जनजीवनावर झाला आहे. पाच महिन्यापासून मंदिर बंद असल्यामुळे डोंगरावर सर्वांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोना संपल्यावर डोंगरावर जोतिबा फेस्टीबल भरवून सर्वांनी पुन्हा नव्या उमेदीने वाटचाल करायची आहे.

-शिवाजीराव सांगळे, उपसरपंच आणि गुरव समाज अध्यक्ष जोतिबा डोंगर

संपादन- धनाजी सुर्वे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com