चंदगडमध्ये कोरोना बाधितांची संख्या १८ वर...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

अलगीकरण कक्षात असताना इतरांशी संपर्क आला असल्यास प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. नागरीकांनी खबरदारी घ्यावी.

चंदगड - तालुक्यात कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. आज कोवाड येथील एका महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आला. त्यामुळे बाधितांची संख्या १८ वर पोहचली आहे.
संबंधीत महिला मुंबईहून आली होती. तिला गावातील एका महाविद्यालयात अलगीकरण कक्षात ठेवले होते. चार दिवसातच सीपीआर रुग्णालयात पाठवले होते. आज तिचा अहवाल पॉझीटीव्ह आला. अजूनही मोठया प्रमाणात स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. त्यामध्ये बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शिवाय अलगीकरण कक्षात असताना इतरांशी संपर्क आला असल्यास प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. नागरीकांनी खबरदारी घ्यावी. सोशल डीस्टन्सींग पाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तालुक्यात गावनिहाय बाधीतांची संख्या अशी : गवसे-३, अलबादेवी -१, सोनारवाडी -१, कमलवाडी -१, बोंजूर्डी - १, नागनवाडी -१, इब्राहीमपूर -२, तेऊरवाडी -२, नागवे-२, शिवणगे-१, चिंचणे-२, कोवाड- १.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patient in Chandgad is over eighteen