कागल मध्ये कोरोनाग्रस्ताची ती सोशल मीडियावर अफवाच...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

 कोरोनाग्रस्त रुग्ण कागलमध्ये आढळलेला नाही. त्या रुग्णास सर्दी व ताप आला आहे. सोशल मीडियावर रुग्णाच्या नावाने पसरवलेला व्हिडिओ त्याचा नसून अन्य राज्यातील आहे.

कागल - कोरोनाग्रस्त रुग्ण कागलमध्ये आढळलेला नाही. त्या रुग्णास सर्दी व ताप आला आहे. सोशल मीडियावर रुग्णाच्या नावाने पसरवलेला व्हिडिओ त्याचा नसून अन्य राज्यातील आहे. हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अज्ञातावर कागल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. अफवांवर नागरिकांनी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

ग्रामीण रुग्णालयातून सीपीआरमध्ये पाठविलेल्या रुग्णाच्या संदर्भात माहिती, छायाचित्र व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाला; मात्र कागलमध्ये कोरोनाचा संसर्ग असलेला रुग्ण सापडल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. त्या व्हिडिओचा व रुग्णाचा शोध घेतला असता कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले नाही. रुग्णाची माहिती व व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient rumors on social media in Kagal