बेळगाव जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हची संख्या 120....

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

जिल्ह्यात झारखंडहून आलेल्याला कोरोना
बाधितांचा आकडा 120 ; बाधित 75 वर्षीय

बेळगाव - झारखंडहून आलेल्या आणि क्वारंटाईन केलेल्या 75 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचे आज (ता.22) निदान झाले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 120 झाली. जिल्ह्यात नव्या नऊ रुग्णांची गुरुवारी भर पडली. सर्वजण बाहेरून आले होते. त्यांच्यासोबत क्वारंटाईन झालेल्या झारखंडच्या संशयितीला कोरोना झाला आहे. कोरोना कक्षात रुग्णाला दाखल करण्यात आले आहे.

70 जणांना डिस्चार्ज

मरकजची साखळी जवळपास तुटलीे. आता परराज्याहून आलेल्यांचा आकडा वाढतोय. मुंबई, अजमेर, राजस्थान, गुजरात, झारखंड येथून आलेल्या सहाशेहून अधिक जणांना कोरोना झाल्याबाबत निदान झाले. त्यापैकीे जिल्ह्यात तीसहून अधिक आहेत. त्यामध्ये एकाची आज भर पडली. झारखंड ते बेळगाव असा प्रवास केलेल्या एकाला कोरोना झाला आहे. ते 75 वर्षाचे आहेत. गुरुवारी जिल्ह्यात नऊ जणांना कोरोना झाल्याचे आढळून आले. पैकी तिघे झारखंडहून परतले आहेत. क्वारंटाईन केले. त्यांच्यासोबत आजची व्यक्तीही क्वारंटाईन होती. वैद्यकीय तपासणी अहवाल प्रयोगशाळेला पाठविला होता. अहवाल आज प्राप्त झाला असून, त्यामध्ये संशयिताला कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 120 झाली आहे. त्यापैकी 70 जणांना डिस्चार्ज दिला आहे. एकाचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालय कोरोना कक्षात 48 जणांवर उपचार सुरु आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive patient found in belgum