esakal | Marathi News Latest & Breaking | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या | eSakal.com
sakal

बोलून बातमी शोधा

Corona positive patient found in bhudargad kolhapur

सलग दुसर्या दिवशी दोन रूग्ण भुदरगड तालुक्यात आढळल्याने खळबळ उडाली.  

भुदरगडमधील ते दोघे निघाले कोरोना पॉझिटिव्ह...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गारगोटी - भुदरगड तालुक्यातील बशाचामोळा व कोंडोशीपैकी सुतारवाडी येथील प्राथमिक शाळेत क्वॉरंटाइन केलेल्या दोघांचा कोरोना अहवाल काल रात्री पॉझीटिव्ह आला. सलग दुसर्या दिवशी दोन रूग्ण भुदरगड तालुक्यात आढळल्याने खळबळ उडाली.  

दरम्यान, या दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी दोन्ही गावांसाठी प्रतिबंधित क्षेत्र आदेश लागू केले आहेत. बशाचामोळा येथील २२ वर्षीय युवक मुंबई परेल येथून १४ मे यादिवशी कोल्हापुरात आला होता. कोल्हापुरातील शासकीय रूग्णालयात त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. यानंतर त्याला  गावातील प्राथमिक शाळेमध्ये क्वॉरंटाईन केले होते. त्याने सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्याची माहिती आरोग्य विभागाला माहिती दिली होती. आरोग्य विभागाने त्याची तपासणी केली होती. सोमवारी उशिरा त्याचा स्वॅब पॉझिटीव्ह आला. आज सकाळी त्याला कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

वाचा - कोल्हापुरात कोरोनाबाधिताचा 'तो' मृतदेह... स्मशानभूमीत ना नातेवाईक ना हुंदक्यांचा आवाज... सगळं काही भयाण...

सुतारवाडी येथील २८ वर्षीय व्यक्ती बशाचामोळा येथील युवकाबरोबर त्याच्या वाहनातून आली होती. सुतारवाडी येथील व्यक्तीचा १४ मे यादिवशी घशाचा स्त्राव घेतला होता. सोमवारी उशिरा त्याचाही अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यालाही उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल केले. सलग दोन दिवसात भुदरगड तालुक्यात दोन रूग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

go to top