वस्त्रनगरीत कोरोनाचा कहर सुरूच मंगळवारी दिवसभरात 53 नवे रुग्ण

Corona's havoc in the textile city continues with 53 new patients on Tuesday
Corona's havoc in the textile city continues with 53 new patients on Tuesday
Updated on

इचलकरंजी ः शहरातील कोरोनाची साखळी खंडित होत नसल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने आज 400 चा टप्पा पार केला. शहरात आज आणखी 53 नवे रुग्ण वाढले; तर गणेशनगरमधील एका 71 वर्षांच्या वृद्धाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. 
एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे नवीन कोरोना रुग्णांना आता रुग्णालयात बेड मिळणे अशक्‍य होत चालले. रुग्णसंख्येतील जलद वाढीमुळे प्रशासन चिंतेत आहे. मृत्युदरही वाढत असल्याने चिंतेत आणखी भर पडत आहे. 
आज 5३ नव्या रुग्णांची भर पडली. यात केटकाळे गल्लीतील एकाच कुटुंबातील चौघांना संसर्ग झाला आहे. अशीच परिस्थिती यशवंत कॉलनीतील कुटुंबाची आहे. या कुटुंबातही चौघे पॉझिटिव्ह आले. जवाहरनगरमधील सहा जणांना, सिद्धार्थ हौसिंग सोसायटीतील चौघांना, तर काडापुरे तळ व भोने माळ परिसरातील प्रत्येकी दोघांना संसर्ग झाला आहे. गणेशनगरमधील एका 71 वर्षांच्या वृद्धाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. त्यांना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


परिसर व रुग्णसंख्या अशी ः 
जवाहरनगर- 6, केटकाळे गल्ली, सिद्धार्थ सोसायटी- प्रत्येकी 4, भोने माळ, काडापुरे तळ- प्रत्येकी 2, दत्तनगर (शहापूर), गुरुकन्ननगर, मणेरे मळा, देवमोरे गल्ली, पुजारी मळा, आर. के. नगर, आंबेडकरनगर, संत मळा, मंगळवार पेठ, मुसळे हायस्कूल, चंदूर रोड, गांधी कॅम्प- प्रत्येकी 1. 
--- 

आकडेवारी दृष्टिक्षेपात 
नवे बाधित रुग्ण-53 
एकूण रुग्ण- 449
ऍक्‍टिव्ह रुग्ण- 352
कोरोनामुक्त रुग्ण- 71 
एकुण मृत- 26 

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com