esakal | आजरा शहर हादरले ; पाच कोरोना बाधीत सापडले...
sakal

बोलून बातमी शोधा

cororna positive patient found in aajra

तीन गल्लीत कंटेन्मेंट झोन ; 50 पेक्षा अधिक जण क्वारंटाईन 

आजरा शहर हादरले ; पाच कोरोना बाधीत सापडले...

sakal_logo
By
रणजित कालेकर

आजरा - आजरेकरांना आजची पहाट धक्का देणारी ठरली. आज मंगळवार (ता. 28) रात्री एक वाजता शहरातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करीत शहर आज लॉकडाऊन करून बाजारपेठ बंद केली. खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरीकांना तातडीने घरी परण्याचे आवाहन करण्यात आले. 

शहरातील आमराई गल्ली, पटेल कॉलनी व जिजामाता कॉलनी या तीन गल्ल्या प्रतिबंधीत क्षेत्र करण्यात आल्या असून घरातून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. बाधीतांच्या संपर्कात आलेल्यांना तातडीने कोविड केअर सेंटरला हलवण्यात येत असून 50 पेक्षा अधिक जणांचे आता पर्यंत संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. ही यादी शंभर पर्यंत जाण्याची शक्‍यता आहे.

आजरा शहरातील आमराई गल्ली व जिजामाता कॉलनी लगत हैदरनगरमध्ये राहणारे एका राजकीय कुटुंबातील प्रमुखासह पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बेळगाव (कर्नाटक) येथील आजारी नातेवाईकांला घेवून ते चार -पाच दिवसांपुर्वी आजऱ्यात आले होते. त्या नातेवाईकाच्या सेवेला कोणी नसल्याने त्यांना आजऱ्यात आणल्याचे सांगण्यात येते. संबंधीताचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधीत नातेवाईकांला त्यांनी कोणत्या आधारे आजऱ्यात आणले. त्यांनी परवानगी घेतली होती का याची चौकशी आजरा पोलीस करीत आहेत. कायदेशीर बाबींची पुर्तता नसल्याने संबंधीतावर कारवाई करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी सांगीतले. दरम्यान त्यांच्या संपर्काताली आणखीन एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

वाचा - ज्यांने दिला मदतीचा हात, त्याच्याच घरी घुसली कोरोनाची साथ... 

दरम्यान आज सकाळच्या अहवालात आजऱ्यातील पटेल कॉलनीतील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधीत व्यक्तीच्या घरातील आजारी व्यक्तीवर कोल्हापुर येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच्या सेवेसाठी त्याची कोल्हापुरला ये- जा होती. आज पहाटेच्या अहवालात खेडे येथील एका तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो दुबईहून आल्याचे सांगण्यात येते. 

दोन तासात बाजारपेठ रिकामी !

आज अनलॉक असल्याने खरेदीसाठी नागरीकांनी सकाळपासून गर्दी केली होती. शहरातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर तहसीलदार विकास अहिर, मुख्याधिकारी अजिंक्‍य पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, गटविकास अधिकारी यांनी बाजारपेठ बंद करण्याची सूचना केली. ग्राहकांना तातडीने घरी जाण्याचे आवाहन केले. 

तीन दिवस शहर बंद

येथील तहसीलदार कार्यालयात नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी व नगरसेवकांची बैठक झाली. तहसीलदार अहिर व मुख्याधिकारी पाटील यांनी मार्गदर्शन केले. गुरुवार (ता.30) पर्यंत शहर लॉकडॉऊन करण्याचे ठरले. रुग्णांच्या संपर्कातील सर्वांचे रिपोर्ट वर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
 

संपादन - मतीन शेख

go to top