कौतुकास्पद... "या' गावात लोकवर्गणीतून उभारणार कोविड सेंटर

युवराज पाटील
Thursday, 3 September 2020

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. दानोळीसह परिसरातील गावांत दररोज रुग्ण सापडत आहेत.

दानोळी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. दानोळीसह परिसरातील गावांत दररोज रुग्ण सापडत आहेत. त्यांची सोय व उपचार करण्याकरिता येथील मराठा सांस्कृतिक हॉलमध्ये 25 बेडचे कोविड सेंटर उभे करण्याचा निर्णय आज येथील सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी घेतला. ऑक्‍सिजनचे 10 व इतर 15 अशा एकूण 25 बेडची सोय लोकवर्गणीतून होणार आहे. 

औषधे, गोळ्या, डॉक्‍टर, नर्स आणि स्टाफ पुरवठा करण्याची जबाबदारी पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष राम शिंदे व सुकुमार सकाप्पा यांनी घेतली. 

आर्थिक मदतीसाठी जनसेवा सोसायटी, श्रीराम सेवा सोसायटी, वसंतदादा दूध डेअरी यांनी मदतीचा हात पुढे केला. गावातील सर्व खासगी डॉक्‍टरांकडून रुग्णांना सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील कोविड सेंटरमध्ये कवठेसार, उमळवाड, जैनापूर, निमशिरगाव व तमदलगे या रुग्णांचीही सोय करण्यात येणार असल्याचे सुकुमार सकाप्पा यांनी सांगितले.

या वेळी सुकुमार सकाप्पा, महादेव धनवडे, सुरेश कांबळे, राम शिंदे, उपसरपंच गब्रू गावडे, गुंडू दळवी, बापूसो दळवी, मानाजीराव भोसले, धन्यकुमार पाराज, वकील पाराज, उदय राऊत, गुरुनाथ माने, अमित दळवी, अशोक आनंदा, दिनकर कांबळे, बापूसो चौगुले उपस्थित होते. 

 

संपादन - सचिन चराटी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Centres To Be Set Up In Danoli Kolhapur Marathi News