आयुष्यभर साथ देण्याचं वचन विसरला ; 8 वर्षांपूर्वी प्रेमविवाह, आता पत्नीचा केला खून, असं काय घडल ?

crime case in shirol sangli husband wife disputes and dead wife in sangli
crime case in shirol sangli husband wife disputes and dead wife in sangli

धरणगुत्ती (सांगली) : शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती इथं पतीने पत्नीचा गळा आवळून आणि ब्लेडने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. दोघांचाही आठ वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. या घटनेने आता खळबळ उडाली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पतीने स्वत: फिनेल पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, धरणगुत्ती इथं जयप्रकाश हौसिंग सोसायटीमध्ये चेतन मनोहर घोरपडे (वय ३०) हा पत्नी अर्चनासह राहत होता. चेतनचा आठ वर्षांपूर्वी शिरोळ इथं राहणाऱ्या अर्चनाशी प्रेमविवाह झाला होता. प्रेम विवाहानंतर गेल्या चार वर्षापासून, चेतन आपल्या आई व आजीपासून वेगळा भाड्याच्या घरात राहत होता. सध्या तो जयप्रकाश हौसिंग सोसायटीमधील जाधव यांच्या घरी भाड्याने राहत होता. त्याच्यासह त्याची पत्नी मौजे आगर जयसिंगपूर हद्दीतील एमआयडीसीमध्ये एकत्र काम करत होते.

गेल्या काही महिन्यापासून, पत्नी जवळच्या एका औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात कामाला जात होती. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता पत्नीला कामावरून घरी बोलवून घेऊन गळ्यावर धारदार ब्लेडने वार करुन मोबाईल चार्जर वायरने गळा आवळून खुन केल्याची घटना उघडकीस आली. पत्नीच्या खूनानंतर चेतन याने घरातील फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान चेतन घोरपडे यांने पत्नीचा खून केल्याची माहिती चुलत्याला सांगून, जयसिंगपूर पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसाने चेतनला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविले आहे. तसेच घटनेची माहिती शिरोळ पोलिसांना दिली. शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी मृत महिलेची आई वासंती प्रकाश पुजारी (रा. विजयसिंह नगर शिरोळ) हिने शिरोळ पोलिसात फिर्याद दिली आहे. मुलीच्या खुनाचे वृत्त समजताच, नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेवून आक्रोश केला. तर आरोपी चेतन याच्या दिनबंधू हौसिंग सोसायटीमधील घरात वातावरण सुन्न झाले होते.
 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com