अलगीकरण कक्षात फुटबॉल खेळणे पडले चांगलेच महागात 

Crimes filed against football players in isolation rooms at kolhapur
Crimes filed against football players in isolation rooms at kolhapur
Updated on

पन्हाळा - वाघबीळमधील एकलव्य कोरोना केअर सेंटरमध्ये शनिवारी पोर्ले विरुद्ध कोतोलीकर यांच्यात रंगलेल्या फुटबॉल सामन्यातील 6 जणांवर  कोडोली पोलिस ठाण्यात  आज गुन्हा नोंद झाला. याबाबतची फिर्याद सेंटरचे समन्वय अधिकारी पंचायत समितीचे बांधकाम शाखा अभियंता प्रवीण अशोक राव यांनी दिली आहे. 

59 रुग्ण या सेंटरमध्ये अलगीकरण कक्षात आहेत. सेंटरमधील अलगीकरण कक्षाच्या व्हरांड्यात पोर्ले व कोतोलीतील सहा कोरोनाग्रस्त शनिवारी चक्‍क फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. इतकेच काय सेंटरमधील अन्य पेशंट खेळ पहात होते.

खेळाडूंनी पोर्ले विरुद्ध कोतोली टीम' असे नावही टीमला दिले होते. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून आज समन्वय अधिकाऱ्यांनी सेंटरला भेट देऊन माहिती घेतली. कोरोनाची लागण झालेली आहे हे माहीत असूनही या सहा जणांनी नियमभंग केल्याने त्यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन, साथीचे रोग अधिनियमांतर्गत फिर्याद दिली आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com