बेळगावतल्या परीक्षा केंद्राबाहेर घडतंय असं... 'तो' बनलाय चिंतेचा विषय...

 crowd of parents outside the examination center is becoming a matter of concern for all in belgum
crowd of parents outside the examination center is becoming a matter of concern for all in belgum
Updated on

बेळगाव - अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे मात्र परीक्षा केंद्रा बाहेर होत असलेली पालकांची गर्दी सर्वासाठी चिंतेचा विषय बनत आहे. याकरीता पालकांनी परीक्षा केंद्राबाहेर सामाजिक अंतर राखणे आवश्‍यक आहे असे मत व्यक्‍त होत आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर यावेळी होत असलेली दहावीची परीक्षा सुरळीतरित्या पार पडावी यासाठी सर्वांनीच नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. गुरुवारी दहावीचा पहिला पेपर पार पडला यावेळी विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी सर्रास परीक्षा केंद्रावर पालकांनी गर्दी गेली होती तसेच सर्वच ठिकाणी पालकांनी सामाजिक अंतर राखण्याकडे लक्ष दिले नाही पेपरला सुरुवात होण्यापुर्वी दिड तास अगोदर पालक परीक्षा केंद्रावर आले होते ही गर्दी दहा वाजेपर्यंत कायम होती त्यानंतर गर्दी कमी झाली पण पुन्हा एकच्या सुमारास मुलांना घेण्यासाठी पालकांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती ही गर्दी दोन वाजेपर्यंत कायम होती. यावेळी अनेक पालक एकत्र थांबुन गप्पा मारताना दिसुन येत होते. त्यामुळे पालकच सामाजिक अंतर राखीत नसल्याचे दिसुन आले.

शिक्षण खात्याने परीक्षा केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्‍यक त्या सुचना केल्या आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांनी सुचनांचे पालन केल्याचे दिसुन आले. थर्मल स्क्रिनिंगनंतर वर्गात गेल्यानंतरही विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतर राखण्यावर भर दिला मात्र पालकांनी केलेली गर्दी धोकादायक ठरु शकते याकरीता विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांनीही नियम पाळणे गरजेचे आहे. राज्यात दिवसेंदिवस, कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत याकडेही पालकांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी परीक्षा केंद्रावर सकाळच्या सत्रात रहदारी पोलीस दिसुन आले मात्र पेपर सुटायच्यावेळी पोलीस नव्हते त्यामुळेही अधिक प्रमाणात गर्दी झाली याकडे पोलीसांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे.

विद्यार्थ्याना सोडण्यात आल्यानंतर परीक्षा केंद्राच्या बाहेर पालकांनी थांबु नये तसेच आपल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दखल घेणे आवश्‍यक आहे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यावेळी अधिक प्रमाणात पोलीसांची मदत घेतली जात आहे.
ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com