कर्नाटक राज्यातील विद्यार्थ्यांच्या पदवी आणि अभियांत्रिकीच्या परीक्षाचा 'हा' झाला निर्णय...

मिलिंद देसाई
शुक्रवार, 10 जुलै 2020

बेंगळूर येथे बोलताना उच्य शिक्षण मंत्रानी कोरोनाच्या संकटामुळे विविध सेमीस्टरच्या परीक्षा घेणे शक्‍य होणार नसुन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

बेळगाव - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याने दिलासा दिला असून यावेळी पदवीच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता डिप्लोमा, पदवीत्तर व इतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री अश्वथ नारायण यांनी शुक्रवारी परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे परीक्षा कधी होणार याबाबतचा संभ्रम दुर झाला असुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशांनुसार सर्व निर्णय घेण्यात आल्याचे उच्च शिक्षण मंत्र्यानी स्पष्ट केले आहे.

बेंगळूर येथे बोलताना उच्य शिक्षण मंत्रानी कोरोनाच्या संकटामुळे विविध सेमीस्टरच्या परीक्षा घेणे शक्‍य होणार नसुन सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र पदवी व डिप्लोमाच्या अंतिम वर्षांची परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर इतर विद्यार्थ्यांना सरासरी गुण काढून पास करीत त्यांना नवीन वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. मात्र विद्यार्थी ज्या परीक्षेत नापास झाले आहेत ते विषय पुढील परीक्षेत उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यासाठी आवश्‍यक आहे. तसेच अगोदरच्या परीक्षेत कमी गुण मिळाले असतील तर ऐच्छिक परीक्षा देण्याचीही मुभाही देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षांबाबत माहिती दिली होती याचा विचार करुन परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासुन परीक्षा कधी होणार याची चिंता लागुन राहिलेले विद्यार्थी पुढील सेमिस्टरचा अभ्यास करु शकणार आहे.

वाचा - बेळगावात 'या' मागण्यांसाठी आशा कर्मचार्‍यांनी छेडले काम बंद आंदोलन...

राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम परीक्षा घेण्याचा सध्या निर्णय घेण्यात आला आहे. मात्र परीक्षा काळात राज्यात कोरोनाची स्थिती कशी असेल याचा विचार करुन परीक्षेचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासुन शाळा, महाविद्यालये बंद आहेत. तसेच सध्याची परिस्थिती पाहता लवकर शाळा व महाविद्यालये सुरु होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
अभियांत्रिकी, बी ए, बी.कॉम व इतर अभ्यासक्रम तीन वर्षांच्या कालावधीचे असुन एकुण सहा सत्र असतात. यामधील फक्‍त सहाव्या सेमिस्टरची परीक्षा होणार आहे. जे अभ्यासक्रम 8 सेमिस्टरचे आहेत तिथे आठव्या तर दहा सेमिस्टर असतील नर दहाव्या सेमिस्टरची परीक्षा घेतली जाणार आहे. तर एमए, एम.कॉम हे दोन वर्षांचे अभ्यासक्रम आहेत त्यामुळे चौथ्या सेमिस्टरची परीक्षा होणार आहे.

 

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decision was taken for the degree and engineering examinations of students in the state of Karnataka