सीमाभागातील मुलींना बस पास सवलत देण्याची मागणी 

Demand for bus pass concession to girls in border areas
Demand for bus pass concession to girls in border areas
Updated on

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर शैक्षणिक केंद्र आहे. शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना बसचा पास मोफत मिळतो. पण, महाराष्ट्राच्या सीमेवरील कर्नाटक राज्यातील विद्यार्थिनींनी पासमध्ये सवलत मिळत नाही. त्यांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे या विद्यार्थिंनीनाही बस पासची सवलत मिळावी, अशी मागणी गडहिंग्लज तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे केली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मागणीचे निवेदन दिले. 

शहरात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय आहे. त्यामुळे शिक्षणासाठी गडहिंग्लजला प्राधान्य दिले जाते. महाराष्ट्र शासनाने बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना सुरू केली आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील विद्यार्थिनींना होतो. मात्र, गडहिंग्लजमध्ये शिक्षणासाठी दड्डी, मणगुत्ती, संकेश्‍वर, कोट, अत्याळ, लिंगनूर, खवणेवाडी, हरगापूरगड आदी कर्नाटकातील गावातूनही विद्यार्थिनी येतात. त्यांना सदरची पासची सवलत मिळत नाही. त्यामुळे आर्थिक भार सहन करावा लागतो. तरी सीमाभागातून येणाऱ्या मुलींनाही किमान महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत मोफत पासची सोय करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. 

पी. बी. रक्ताडे, व्ही. व्ही. किणीकर, सी. बी. कानडे, आशपाक मकानदार, एम. जी. पेडणेकर, संतोष देसाई, एस. एन. सामानगडकर, एन. व्ही. गावडे, पी. व्ही. माळी, विजय काळे, एस. आर. बाडकर, एस. पी. गणाचार्य, अनिता कांबळे, दयानंद ग्वाडी, प्रवीण पाटील, वाय. आर. पाटील आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com