
सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाळवा तालुक्यातील सोयाबीन, भात, हळद ,आले, द्राक्षे, केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले
नवेखेड (जि. सांगली) -अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना 63 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. मात्र अद्यापि एक कोटी 20 लाखाचे अनुदान प्रलंबित आहे.
वाळवा तालुक्यात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाळवा तालुक्यातील सोयाबीन, भात, हळद ,आले, द्राक्षे, केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कोरोनामुळे आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांचा दृष्टीनं अतिवृष्टी म्हणजे बुडत्याचा पाय खोलात अशी अवस्था झाली होती. कारण हातातोंडाशी आलेला खरीप मातीमोल झाला होता. काढणीयोग्य झालेली पिके वाया गेली होती. सरकारने अतिवृष्टीमध्ये बाधित पिकांना प्रतिगुठा शंभर रुपये मदतीची घोषणा केली. कृषी व महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी नियोजन करून पंधरा दिवसात बाधित पिकांचे पंचनामे केले व तात्काळ अहवाल पाठवला. यामध्ये 1437 हेकटर मधील पिके बाधित झाली. 5843शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता.
हे पण वाचा - चंपा म्हणल्याने अजिबात राग येत नाही ; चंद्रकांत पाटील
पहिल्या टप्प्यात 63 लाख इतकी नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित एक कोटी 20 लाख रुपयांची रक्कम दुसऱ्या टप्प्यात जमा होईल
. -भगवानराव माने, तालुका कृषी अधिकारी इस्लामपूर
संपादन - धनाजी सुर्वे