ढोलगरवाडीने जपला "एक तास गावासाठी' उपक्रम

In Dholgarwadi  "One hour For village ' activities Kolhapur Marathi News
In Dholgarwadi "One hour For village ' activities Kolhapur Marathi News

कोवाड : थोर समाजसुधारकांचे विचार समाजाला वैचारिक अधिष्ठान मिळवून देणारे असतात; पण त्यांचे हे विचार केवळ पुस्तकात न ठेवता प्रत्यक्षात ते आचरणात आणल्यास खऱ्या अर्थाने समाजाचे परिवर्तन होऊ शकते. याच विचाराने ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांनी संत गाडगेबाबा महाराज यांचा स्वच्छतेचा संदेश घेऊन गावात गाडगेबाबा स्वच्छता अभियान सुरू केले आहे. अभियानांतर्गत प्रत्येक आठवड्यातील दर रविवारी "एक तास गावासाठी' उपक्रम राबविला जातो.

या अभियानाला 2 वर्षे 30 आठवडे पूर्ण झाले. यानिमित्त गावच्या स्वच्छता मोहिमेला या अभियानातून अधिक जोमाने गती देण्याचा निर्धार आज ढोलगरवाडी ग्रामस्थांनी गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त केला. 

उपसरपंच कल्लापा पाटील यांनी गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी गाडगे महाराजांच्या विचारांना चालना देण्यासाठी गावात स्वच्छता अभियान अवितरतपणे सुरू ठेवण्याचा संकल्प केला. यावेळी प्रा. दीपक पाटील, गावडू पाटील, सुनील सपताळे, प्रकाश भोगुलकर, शिवाजी तुपारे, अभिजित पाटील, एस. जे. पाटील, नितीन पाटील, राजू पाटील, आर. जी. पाटील, सागर नेसरकर, बबन पाटील, नरसू पाटील व श्रीनाथ माडूळकर उपस्थित होते. 
दोन वर्षांपासून ग्रामस्थांनी संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानांतर्गत प्रत्येक आठवड्यातील दर रविवारी "एक तास गावासाठी' ही संकल्पना सुरू केली.

गावाने आपल्यासाठी काय केले, यापेक्षा गावासाठी आपण काय केले पाहिजे या विचाराने सर्व ग्रामस्थांना एकत्रित आणले आणि गाडगेबाबा स्वच्छता अभियान सुरू केले. दर रविवारी ग्रामस्थ घरातूनच हातात झाडू, फावडे, कुदळ हे साहित्य घेऊन येतात. एक तास स्वच्छतेचे काम करतात. पुढील आठवड्यातील कामाचे नियोजन करून घरी निघून जातात.

नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले लोकही आवर्जून रविवारी गावी येतात. 2 वर्षे 30 आठवडे या अभियानाला पूर्ण झाल्याने आज संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त पुन्हा हे अभियान बळकट करण्याचा ग्रामस्थानी निर्णय घेतला. 

विधायक दिशा देण्यासाठी...
गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. त्यांचे कीर्तन म्हणजे लोकप्रबोधनाचा एक भाग होता. सामाजिक रूढी आणि परंपरेची टीका त्यात असायची. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली. त्यांच्याच विचाराने गावाला विधायक दिशा देण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. 
- प्रा. दीपक पाटील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com