बेळगावच्या डाॅक्टर लेकीची अमेरिकेत कोरोना विरुद्घ अशी सुरु आहे लढाई...

doctor dipti express her experience on about corona in america
doctor dipti express her experience on about corona in america
Updated on: 

बेळगाव - कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक डॉक्‍टर आपल्या परीने हातभार लावीत आहे. यामध्ये अमेरिकेत असलेले भारतीय डॉक्‍टरर्सही कार्यरत आहेत. तेथील काही डॉक्‍टर्सना दिवसातून तीन तास नियमितपणे हॉस्पिटलमध्ये जाऊन तातडीने उपचाराची आवश्‍यकता असलेल्या रुग्नांसाठी सेवा देण्याची सुचना करण्यात आली आहे. मात्र यामुळे साऱ्या खेळीमेळीच्या वातावरणात सर्व नीट चालले असताना कोविड 19 ने सर्वांची झोप उडविली आहे असे मत बेळगावातील व सध्या अमेरीकेत कार्यरत असलेल्या डॉक्‍टर दीप्ती गेज्जी (गुडी) यांनी व्यक्‍त केले आहे.

बेळगाव येथील डॉक्‍टर दीप्ती गेजी (गुडी) या व्हर्जिनिया (अमेरिका) येथे वास्तव्यास आहेत सध्या अमेरिकेत कोव्हिड 19 ने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे अमेरीकेत असलेल्या मुलांची त्यांच्या आई वडीलांना काळजी लागली आहे तर मुलांना आपल्या आई वडीलांची असेच चित्र दिसुन येत आहे. दिप्ती यांचे आई वडील अनिल व स्नेहा गुडी बेळगावात असतात. अमेरीकेत कोवीड 19 च्या काळात देखील दिप्तीला रुग्णालयात जावे लागत असले तरी संकटाच्या काळात देखिल एक डॉक्‍टर स्वतःची व्यवस्थित काळजी घेत कार्यरत असणाऱ्या मुलीचा गुडी कुटुंबाला अभिमान असुन दिप्ती हिने अमेरीकेतुन संदेश देताना ज्यांची मुले भारताबाहेर राहतात ज्यांच्या आई-वडिलांनी इथली काळजी न करता तुम्ही स्वतःची काळजी घेणे आवश्‍यक असुन आम्ही आमची काळजी घेत आहोतच कोविड 19 साठी जेष्ठ नागरीकांनी खास काळजी घ्यावी. शक्‍य तितके घरात रहा सोशल डिस्टन्ससिंग पाळा असे आवाहन केले आहे.

2009 मध्ये सिद्धार्थ गेज्जी यांच्याबरोबर लग्न झाल्यावर व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये दिप्ती यांना प्रवेश मिळाला तर सिध्दार्थ
यांनी हावर्ड युनिव्हर्सिटीतून पब्लिक पॉलिसीमध्ये मास्टर्स केल आहे. या दांपत्यांना पाच वर्षाची मुलगी असुन अमेरीकेत सर्व काही व्यवस्थितरित्या सुरु असताना कोरोनामुळे 16 मार्चपासुन व्हर्जिनिया मध्ये पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले तर सरकारने काय करावे आणि काय करु नये आखणी घालून दिली आहे त्यानुसार कार्य करावे लागत आहे अशी माहिती दिप्ती यांनी दिली आहे.

कोविड 19 चा धोका जगभर वाढत असला तरी अजुन भारतात कोरोना आटोक्‍यात आहे याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी लागु केलेला लॉकडाऊन असल्याचे मत डॉ. दिप्ती यांनी व्यक्‍त केले असुन भारतातल्या नागरीकांनी काही आवश्‍यक गोष्टींचे पालन करणे आवश्‍यक आहे तरच कोरोना नियंत्रणात येऊ शकेल असेही त्यांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Viral Audio Allegations Against Ravikiran Ingawale
Kolhapur District Bank Election 2026 Draft Voter List To Be Published Soon Polling Likely In December
Punyashlok Ahilyadevi loan waiver
Kolhapur Gokul Milk Union Election
Marathi News Esakal
www.esakal.com