डॉक्‍टर, काजू खाल्लाय, तसं काही नाही! 

 Doctor, eat nuts, nothing like that!
Doctor, eat nuts, nothing like that!
Updated on: 

कोल्हापूर ः मुंबईत राहणारा तरुण महिनाभरापूर्वी शाहूवाडी तालुक्‍यातील गावी परतला. दक्षतेचा भाग म्हणून त्याला क्वारंटाईन केले. त्याचा कालावधी पूर्ण झाला. तसा तो निर्धास्त झाला. रानफळांबरोबर त्याने काजूवरही ताव मारला. तसा त्याचा खसा दुखू लागला. नातेवाइकांसह ग्रामस्थही हादरून गेले. त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. घसा व ताप पाहून त्याला सीपीआरला हलवा, असे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले. तसा तो तरुण सांगू लागला, "मी काजू खाल्लाय डॉक्‍टर, तसं काही नाही.' परंतु, त्याचे कोणी ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्याला सीपीआरमध्ये हलविले. तेथे त्याला डबल क्वारंटाईन केले.

शाहूवाडी तालुक्‍यातील सुमारे 10 हजार लोक मुंबई-पुण्यात राहतात. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी संचारबंदी लागू करताच हे लोक गावी परतू लागले. तसाच तोही महिनाभरापूर्वी गावी परतला. त्याला क्वारंटाईन केले. त्याचा कालावधी पूर्ण झाला. त्याच्यासह त्याच्या नातेवाइकांनी धीर सोडला. दरम्यान, तरुणाला रानफळांचा अस्वाद घेण्याचा मोह आवरला नाही. त्याने काजूवर ताव मारला. तसा त्याचा घसा दुखू लागला. घशाच्या दुखण्याने त्याला तापही आला, तसे घरच्यांबरोबर आसपासचे नागरिकही हादरून गेले. त्याला स्थानिक रुग्णालयात नेले. तेथे त्याचा घसा व ताप पाहून डॉक्‍टरांनी नो रिस्क म्हणून थेट सीपीआरमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला. तो तरुण घशाच्या दुखण्यातूनही "डॉक्‍टर, मी काजू खाल्लेत' असे सांगण्याचा प्रयत्न करीत होता; पण त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. दक्षतेचा भाग म्हणून त्याला पुन्हा क्वारंटाईन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com