esakal | "आयएसएल' फुटबॉलमध्ये ईस्ट बंगालचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

East Bengal Team In ISL Football Kolhapur Marathi News

फुटबॉल स्पोटस्‌ डेव्हलपमेंन्ट इंडिया लिमिटेडतर्फे (एफएसडीएल) होणाऱ्या इंडियन सुपर लिग (आयएसएल) मध्ये अपेक्षेप्रमाणे कोलकत्याच्या नामांकित ईस्ट बंगाल संघाच्या समावेशाची घोषणा आज झाली.

"आयएसएल' फुटबॉलमध्ये ईस्ट बंगालचा समावेश

sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : फुटबॉल स्पोटस्‌ डेव्हलपमेंन्ट इंडिया लिमिटेडतर्फे (एफएसडीएल) होणाऱ्या इंडियन सुपर लिग (आयएसएल) मध्ये अपेक्षेप्रमाणे कोलकत्याच्या नामांकित ईस्ट बंगाल संघाच्या समावेशाची घोषणा आज झाली. यामुळे प्रेक्षकांविना नोव्हेंबरपासून गोव्यात होणऱ्या या स्पर्धेच्या सातव्या हंगामात ईस्ट बंगालला प्रवेश मिळेल. संघाच्या समावेशामुळे स्पर्धेतील संघांची संख्या 11 वर पोहोचली. 

एफएसडीएलने नव्या संघा संघासाठी निविदा काढली होती. त्यासाठी सतरा सप्टेंबरपर्यंत निविदा भरण्याची मुदत होती. यात ईस्ट बंगालची एकमेव निविदा आली. ईस्ट बंगालच्या आयएसएल सहभागासाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची शिष्ठाई कामी आली. श्री. सिंमेट हा भक्कम पुरस्कर्ता मिळवून दिल्याने या संघाने आयएसएलसाठी निविदा भरली. एफएसडीएलच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी आज या संघाच्या समावेशाची घोषणा केली. 

गतवर्षी कोलकात्याच्या एटीके संघाने इंडियन फुटबॉल लीग (आय लिग) मधील मोहन बागान संघाचे शेअर्स खरेदी केले. त्यामुळे हे दोन्हीं संघाचे एकत्रीकरण झाले आहे. आयएसएलमध्ये यंदा एटिके मोहन बागान या नावाने हा संघ सहभागी होणार आहे. त्यामुळेच कट्टर प्रतिस्पर्धी ईस्ट बंगाल संघानेही आयएसएलमध्ये उतरावे असा चाहत्यांचा दबाव होता. लाखों चाहत्याची संख्या लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणूकावर नजर ठेवुन बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जीनी पाठबळ देण्याचा निर्णय घेतल्याने ईस्ट बंगालच्या आशा बळावल्या होत्या. 

सध्या या स्पर्धेत ऐटिके मोहन बागान, एफसी गोवा, बंगलुरु एफसी, चेन्नईन एफसी, जमशेदपूर एफसी, ओडासा एफसी, हैद्राबाद एफसी, केरला ब्लास्टर्स, नॅर्थ ईस्ट युनायटेड, मुंबई सिटी एफसी, असे दहा संघ आहेत. त्यात अकराव्या ईस्ट बंगालची भर पडली आहे. कोलकत्याचा एटिके हा स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्‌ट्रीक साकारणारा सर्वाधिक यशस्वी संघ आहे. 

कोलकत्ता "डर्बी' अस्तित्व कायम 
फुटबॉल वेड्या बंगालमधील शतकाहुनही अधिक गौरवशाली इतिहास मोहन बागान आणि ईस्ट बंगाल या कट्टरप्रतिस्पर्धी संघाना आहे. लाखो चाहते असणाऱ्या या दोन संघातील लढत "कोलकत्ता डर्बी" जागतिक फुटबॉलमध्येही लक्षवेधी मानली जाते. मोहन बागान पाठोपाठ ईस्ट बंगाल आयएसएल मध्ये सहभागी झाल्याने या ऐतिहासिक "कोलकत्ता डर्बी"चे अस्तित्व कायम राहणार आहे. 

संपादन - सचिन चराटी