टस्कराने पलटी केला पॉवर ट्रीलर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elephant  Damage Cane Crop In Ajara

गेली आठ दिवस इटे परिसरात धुमाकूळ घातलेल्या टस्कराने चितळे परिसरात मोर्चा वळवला आहे. येथील ऊस पिकाचे नुकसान तो करीत असून त्यांने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गुरुवारी (ता. 23) मध्यरात्री शामराव गुडूळकर यांच्या आजरा-चंदगड रस्त्यावरील शेतातील पॉवर ट्रीलर पलटी करून टाकला. 

टस्कराने पलटी केला पॉवर ट्रीलर

आजरा : गेली आठ दिवस इटे परिसरात धुमाकूळ घातलेल्या टस्कराने चितळे परिसरात मोर्चा वळवला आहे. येथील ऊस पिकाचे नुकसान तो करीत असून त्यांने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गुरुवारी (ता. 23) मध्यरात्री शामराव गुडूळकर यांच्या आजरा-चंदगड रस्त्यावरील शेतातील पॉवर ट्रीलर पलटी करून टाकला. 

इटे परिसरात गेली आठ दिवस टस्कर धुमाकूळ घालत होता. केळी, मेसकाठी व उसाचे नुकसान केले होते. त्यामुळे या परिसरातून टस्काराला हुसकावून लावावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली होती. दरम्यान, टस्करने या परिसरातून मोर्चा चितळे परिसराकडे वळवला आहे.

काल मध्यरात्री मानवेंद्र सरदेसाई व प्रभाकर सरदेसाई यांच्या ऊस पिकाचे नुकसान केले. त्याचबरोबर शामराव गुडूळकर यांच्या पॉवर ट्रीलर सोंडेने उलटून टाकला. यामुळे पॉवर ट्रीलरचे नुकसान झाले. वर्षभरानंतर टस्कर या परिसरात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंतेने घेरले आहे. आठ महिन्यापुर्वी चितळे परिसरात हत्तीचा कळप आला होता. 

राखणीला जाणे धोक्‍याचे 
टस्कर या परिसरात आल्याने त्याच्या भितीने शेतकऱ्यांनी पिकांच्या राखणीला जाणे बंद केले आहे. त्यामुळे गव्याचे कळप शेतात उतरू लागले आहेत, असे शेतकरी जयवंत सरदेसाई यांनी सांगितले.