शिरोळ तालुक्यात लम्पी आजाराची एंट्री

Entry Of Lampi Disease In Shirol Taluka Kolhapur Marathi News
Entry Of Lampi Disease In Shirol Taluka Kolhapur Marathi News
Updated on

इचलकरंजी : मराठवाडा, विदर्भात जनावरांच्या जीवाशी खेळणाऱ्या लम्पी आजाराने आता शिरोळ तालुक्‍यात एंट्री केली आहे. तालुक्‍यातील काही गावांत जनावरांमध्ये लम्पी आढळून आला असून, खासगी डॉक्‍टरांसह पशुधन विभागाने यावर उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना लम्पी आजाराने मात्र पशुपालकांची चिंता वाढवली आहे.

कोरोनाने मानवास वेठीस धरून थैमान घातले. कोरोनासारखाच प्रसार होणाऱ्या मात्र जनावरांमध्ये होणाऱ्या लम्पी रोगाने ऑगस्ट, सप्टेंबरपासून मराठवाडा विदर्भात तोंड वर काढले आहे. तेथे लम्पीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने आटोक्‍यात आणणे आव्हानात्मक झाले. लम्पी आता शिरोळ तालुक्‍यातील जनावरांमध्ये दिसू लागला आहे. काही दिवसांपूर्वी नांदणी-शिरढोण या गावात लम्पी प्रकर्षाने दिसून आला. लम्पी प्रादुर्भावाची तीव्रता कमी असल्याने जनावरांना बरे करण्यात डॉक्‍टरांना यश आले, मात्र संसर्गजन्य असणारा लम्पी किती जनावरांपर्यंत पोहोचेल, प्रादुर्भाव किती वाढेल, याची धास्ती पशुपालकांमध्ये आहे. 

लम्पी हा आजार संसर्गजन्य असल्याने डास, गोचीड, गोमाशा यांच्याद्वारे तसेच आजारी जनावरांच्या संपर्कातील खाद्य, पाणी, भांडे यामुळे संसर्ग वाढतो. सध्या कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजारही सुरू झाले आहेत. जनावरांची वाहतूक वाढली आहे. त्यामुळे लम्पीचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

काय आहे लम्पी ? 
लम्पी हा रोग पोक्‍सविरीड या विषाणूच्या जातीमधील क्रप्रीपोक्‍स या विषाणूमुळे होतो. हा आजार संसर्गजन्य असून जनावरांना दोन-तीन दिवस तीव्र ताप येतो. शरीरावर घट्ट गोलाकार फोड येऊन त्यावर खपली तयार होतात. जनावरांचे वजन कमी होऊन चारा खाणे कमी होते. दुधाळ जनावरांत दूध उत्पादन कमी होऊन वंध्यत्व येते. 

पशुपालकांत जागृती महत्त्वाची
शिरढोण येथे दोन जनावरांना लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला. वेळीच उपचार करून आटोक्‍यात आणले. प्राथमिक संसर्गाचा टप्पा असल्याने सध्या जास्त परिणाम जाणवणार नाहीत. संसर्ग वाढण्याअगोदरच पशुपालकांत जागृती महत्त्वाची आहे. 
-डॉ. भानुदास सूर्यवंशी, खासगी पशुवैद्य 

उपाययोजना केल्या जात आहेत
तालुक्‍यातील लम्पी आजाराने ग्रस्त असणाऱ्या जनावरांचे प्रमाण कमी आहे. लम्पीवर लस नसल्याने वेळीच औषधोपचार करावे लागतात. जनावरांमध्ये हा रोग आढळल्यास उपाययोजना केल्या जात आहेत. 
-डॉ. सुनील केतकर, पशुवैद्यकीय अधिकारी 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sahyadri Express
Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Marathi News Esakal
www.esakal.com