
काल सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शिवाजी पेठेत एका अरुंद गल्लीमधे असणारया घरात अचानक गॅस सिलेंडर लिकेज होऊन आग लागल्याची घटना घडली. काही क्षणातच आगीची तीव्रता वाढताच रहिवाशांना आरडाओरडा सुरू केला.
महाराजांची मिरवणूक संपताच पिता-पुञ जवानांनी विझवली घरामध्ये लागलेली आग...
कोल्हापूर - राज्यभरात सर्वत्र शिवजयंतीचा उत्सव आनंदात सुरू होता व महाराजांच्या मिरवणूका सुरू असताना काल सायंकाळी कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेत एका घरामध्ये सिलेंडर लिकेज होऊन आग लागली होती. आग लागताच स्थानिकांनी तेथील अग्निशमन दलाशी संपर्क साधला. परंतु, तेथेच शेजारी राहणारे व २०१३ साली सेवानिवृत्त झालेले कोल्हापुर अग्निशमन दलाचे जवान दिलीप माने व पुणे अग्निशमन दलामधे कार्यरत असलेले व सध्या सुट्टी करिता घरी आलेले त्यांचे पुञ जवान धर्मराज माने यांनी धाव घेऊन आग विझवत पिता व पुञ दोघांनी कर्तव्य चोख बजावले.
आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला
काल सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शिवाजी पेठेत एका अरुंद गल्लीमधे असणारया घरात अचानक गॅस सिलेंडर लिकेज होऊन आग लागल्याची घटना घडली. काही क्षणातच आगीची तीव्रता वाढताच रहिवाशांना आरडाओरडा सुरू केला.
त्याचवेळी नुकतीच शिवरायांची मिरवणूक संपवून आलेले व शेजारी राहणारे माने कुटूंबिय यांनी आगीकडे धाव घेतली. घरामध्ये असलेल्या पाईपच्या साह्याने पाणी मारून आग आटोक्यात आणत लिकेज गॅस सिलेंडर बंद करत तातडीने बाहेर घेतला. तोपर्यंत अग्निशमन दलाचे वाहन ही दाखल झाले व त्यांनी पुढील काम करीत आग पुर्ण विझवली. सदर आगीमधे घराचे नुकसान झाले असून कोणी जखमी नाही. वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.
वाचा - कोल्हापूरातल्या दोन खासदारांमध्ये विमानतळावरून खडाखडी....
पिता - पुञ या दोघांनी केलेल्या कामगिरीचे विषेश कौतुक स्थानिक व कोल्हापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी केले. आपल्या वडिलांची या वयात असणारी तत्परता व चलाखी पाहून "जवान सेवानिवृत्त झाला तरी त्याच्या अंगी आपले कर्तव्य चोख बजावण्याची कुवत असते" असे त्यांचे पुञ पुणे अग्निशमन दलाचे जवान धर्मराज माने यांनी सांगितले.