खेर्डी ग्रामपंचायतीत निकालापूर्वीच फुटले फटाके 

Firecrackers exploded in Kherdi Grampanchayat before the result
Firecrackers exploded in Kherdi Grampanchayat before the result

चिपळूण ( रत्नागिरी ) - तालुक्‍यातील सर्वाधिक चुरस असलेल्या खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान झाल्यानंतर सायंकाळी दोन्ही गटाकडून फटाके फोडण्यात आले. सुखाई परिवर्तन आणि गावविकास पॅनेलच्या पदाधिकाऱ्यांनी विजयाचा दावा केला आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुक्‍यात 71 टक्के मतदान झाले आहे. तालुक्‍यातील 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान झाले आहे. तालुक्‍यातील 79 हजार 501 मतदारांपैकी 56 हजार 507 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 27 हजार 825 महिला तर 28 हजार 632 पुरुष मतदारांनी मतदान केले. तालुक्‍यात सर्वत्र शांततेत मतदान झाले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये मतदान यंत्र येत होती. रात्री उशिरा ही मतदान यंत्र सील करण्यात आली. सोमवारी सकाळी गुरुदक्षिणा सभागृहात मतमोजणी होणार आहे. शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतमोजणीची तयारी करण्यात येत आहे. 

खेर्डी 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सुखाई परिवर्तन पॅनेल विरुद्ध सुखाई गावविकास पॅनेल यांच्यात चुरस आहे. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांचे सुपुत्र शुभम खताते, विनोद भुरण, विराज खताते, रियाज खेरटकर तसेच प्रभाग पाचमधील लढतीकडे विशेष लक्ष आहे. सुखाई परिवर्तन पॅनेलचे नेते प्रशांत यादव यांना निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले, आम्हाला खेर्डी ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मतदारराजाने आपल्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपल्याला मोठे यश मिळेल. 


खेर्डी ग्रामस्थांनी आमच्यावर विश्वास टाकला आहे. तो विश्वास मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. आम्ही 12 पेक्षा अधिक जागा जिंकून खेर्डीत सत्तेवर येऊ. 
- अबू ठसाळे, सुखाई गाव विकास पॅनेल 

मतदारांनी कौल दिला आहे. निवडणूक संपली आहे. विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करायचे आहे. मतदारांच्या विश्वासामुळे आम्हाला सत्ता मिळेल यात शंका नाही. 
- दशरथ दाभोळकर, सुखाई गाव विकास पॅनेल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com