esakal | ब्रेकिंग- बेळगावात आणखी पाच जणांना कोरोनाची लागण ; रुग्णांची संख्या झाली एवढी
sakal

बोलून बातमी शोधा

five corona positive patient in belgaum

जिल्ह्यात गुरुवारी बाधितांची संख्या 36 होती. आज परत पाच रुग्ण वाढले. आज सकाळी पहिली यादी जाहीर झाली. त्यामध्ये 38 रुग्ण आढळले होते. पण, बेळगावातील रुग्ण नव्हता. पण, सायंकाळी दुसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये बेळगाव कॅम्पमधील पाच रुग्ण आढळले आहेत.

ब्रेकिंग- बेळगावात आणखी पाच जणांना कोरोनाची लागण ; रुग्णांची संख्या झाली एवढी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - जिल्ह्यात नव्या पाच कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गुरुवारी बाधित रुग्णांची संख्या 36 होती. त्यामध्ये आज (ता.18) 5 रुग्ण वाढल्यामुळे संसर्ग रुग्णांची संख्या 41 झाली आहे. बाधित बेळगाव शहरातील कॅम्प परिसरातील आहेत. 

दरम्यान, कर्नाटक राज्यात 24 तासात 44 रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण रुग्ण 359 झाले आहेत. 

जिल्ह्यात गुरुवारी बाधितांची संख्या 36 होती. आज परत पाच रुग्ण वाढले. आज सकाळी पहिली यादी जाहीर झाली. त्यामध्ये 38 रुग्ण आढळले होते. पण, बेळगावातील रुग्ण नव्हता. पण, सायंकाळी दुसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये बेळगाव कॅम्पमधील पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे 41 रुग्ण झाले आहेत. कॅम्पमधील सर्व बाधित पुरुष आहेत. त्यांचे अनुक्रमे वय 34, 17, 46, 37 आणि 38 आहे. रुग्णांनी बाधित रुग्णांशी संपर्क केला होता. दिल्ली निझामुद्दिनमधील धार्मिक कार्यक्रमात कॅम्पमधील तरुणाने मार्च महिन्यांत भाग घेतला होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपचार सुरु होते. पण, या रुग्णाशी अन्य सदस्यांनी संपर्क केला होता. त्यांना ताप, खोकला, ताप येण्याची लक्षणे होती. त्यासाठी संशयितांच्या घशातील स्वॅब प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते. अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाने पुढील कार्यवाही सुरु केली आहे.