कर्नाटकात 5 पॉझिटिव्ह ; दोघांचा बळी; बाधितांची संख्या झाली एवढी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

कोरोना बाधितांच्या आकड्यात दोन दिवसांत घट झाली. बाधितांची सरासरी आकडेवारी कमी झाली. मोठा दिलासा मिळाला आहे. पण, विषाणूवर नियंत्रणासाठी प्रत्येकांनी अंतर ठेवणे अपेक्षित आहे. घरीच थांबावे, पुढील आदेश येईपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

बेळगाव - राज्यात 24 तासांत कोरोना पॉझिटिव्हचे पाच रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे कर्नाटकात आता कोरोना रुग्णांची संख्या 395 झाली आहे. 

हे सर्व पॉझिटिव्ह गुलबर्गा जिल्ह्यातील आहेत. त्यांना कोरोना कक्षात दाखल केले आहे. 2 दिवसांत 11 नव्या रुग्णांची भर पडली आहे. सुखदबाब म्हणजे बेळगाव जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण या दरम्यान आढळला नाही. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 42 कायम आहे. 

दरम्यान, राज्यात मृतांच्या आकड्यात वाढ होऊन 14 वरून 16 झाली आहे. 111 जणांना डिस्जार्ज दिले आहे. 

कोरोना बाधितांच्या आकड्यात दोन दिवसांत घट झाली. बाधितांची सरासरी आकडेवारी कमी झाली. मोठा दिलासा मिळाला आहे. पण, विषाणूवर नियंत्रणासाठी प्रत्येकांनी अंतर ठेवणे अपेक्षित आहे. घरीच थांबावे, पुढील आदेश येईपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

गुलबर्ग्यामध्ये अनुक्रमे 17, 13, 30, 50, 19 वर्षाच्या तरुणांना विषाणूची लागण झाली आहे. बाधित व्यक्तींच्या संपर्कात पाच संशयित आल्यामुळे विषाणूचे संक्रमण झाले. 

नव्या पाच रुग्णांची भर पडल्यामुळे राज्यात 395 झाले. दोघांचा 24 तासात (रविवारी) बळी गेला. मृतांचा आकडा 16 झाला. तसेच 24 मार्च ते 20 एप्रिल या दरम्यान पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु होते. त्याला प्रतिसाद दिलेल्या 111 जणांची प्रकृती सुधारली होती. त्यासाठी डिस्जार्ज दिले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five Corona positive patients increased in 24 hours in karnataka