कोल्हापुरात पाच "ओटीटी' प्रोजेक्‍ट येणार...!

प्रतिनिधी
Monday, 18 May 2020

"नेटफ्लिक्‍स', "हॉटस्टार', "ऍमेझॉन प्राईम', "एमएक्‍स प्लेअर', "व्हूट' असे सात ते आठ "ओटीटी' प्लॅटफॉर्म सध्या लोकप्रिय आहेत आणि त्यांचा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढतोच आहे. कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनच्या काळात चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद झाले. पर्याय म्हणून जुन्या मालिका पुन्हा टीव्हीवर सुरू झाल्या

कोल्हापूरः येथे शूटिंगसाठी सकारात्मक प्रयत्न सुरू झाल्यानंतर आता एकूण पाच ओटीटी (ओव्हर दि टॉप) प्रोजेक्‍ट कोल्हापुरात येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यात दोन चित्रपटांसह तीन वेबसिरीजचा समावेश असून, संबंधित निर्माते, निर्मिती संस्थांशी सकारात्मक बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. 
"नेटफ्लिक्‍स', "हॉटस्टार', "ऍमेझॉन प्राईम', "एमएक्‍स प्लेअर', "व्हूट' असे सात ते आठ "ओटीटी' प्लॅटफॉर्म सध्या लोकप्रिय आहेत आणि त्यांचा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढतोच आहे. कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनच्या काळात चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद झाले. पर्याय म्हणून जुन्या मालिका पुन्हा टीव्हीवर सुरू झाल्या. मात्र, या साऱ्या पार्श्‍वभूमीवरही "ओटीटी' प्लॅटफॉर्मवर काहीच परिणाम झालेला नाही. उलट येथील प्रेक्षकांची संख्या 35 हून अधिक टक्‍क्‍यांनी वाढली आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर ओटीटी प्लॅटफॉर्म कोल्हापूरसाठीही फायद्याचा राहणार आहे. 
एकट्या "प्लॅनेट मराठी' या निर्मिती संस्थेचा विचार केला तर या संस्थेची पहिलीच निर्मिती असलेला "एबी आणि सीडी' हा धम्माल सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून सिनेमा व नाट्यगृहे बंद झाली; मात्र निर्माते अक्षय बर्दापूरकर आणि टीमने हा सिनेमा "ओटीटी' प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. या प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा तुफान चालला. हीच निर्मिती संस्था आता सहा नव्या सिनेमा आणि वेबसिरीजची निर्मिती करणार असल्याची घोषणा नुकतीच झाली आहे. त्यामुळे आता लॉकडाउनच्या काळात कोलमडलेले अर्थकारण सुरळीत करण्यासाठी विविध प्रयत्न मनोरंजन क्षेत्रात सुरू झाले आहेत. 
हिंदीबरोबरच मराठी सिनेमेही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ लागले आहेत. त्याला चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरातील संधी आणखी वाढत राहणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five "OTT" projects to come in Kolhapur ...!