इचलकरंजीतील कोरोनाचे पाच वॉर्ड बंद

Five Wards Of Corona In Ichalkaranji Closed Kolhapur Marathi News
Five Wards Of Corona In Ichalkaranji Closed Kolhapur Marathi News
Updated on: 

इचलकरंजी : सर्वसामान्यांसाठी आरोग्यदायिनी असलेल्या आयजीएम रुग्णालयावरील कोरोनाचा ताण आता कमी होत आहे. आयजीएममधील कोरोनाबाधित उपचारासाठी असलेल्या स्वतंत्र दहा वॉर्डमध्ये पाच वॉर्ड बंद केले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भावही आटोक्‍यात येत आहे. त्यामुळे आयजीएम रुग्णालयापासून दुरावलेल्या सामान्य रुग्णांना नॉन कोविड उपचार सुरू होतील, अशी आशा आहे. या आशेने सामान्य रुग्ण आयजीएमच्या प्रतीक्षेत आहे. 

कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून आयजीएम रुग्णालयात 18 हजार 466 जणांची कोरोनासंबंधी तपासणी केली. यामध्ये गरजेनुसार अँटिजेन, आरटीपीसीआर यांसह आवश्‍यक तपासणी केली. रुग्णालयात अतिदक्षता विभागासह स्वतंत्र रूम आणि 10 वॉर्डामध्ये रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी आज अखेर 1 हजार 466 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर 3 हजार 246 कोरोना संदिग्ध रुग्णांवर उपचार केले.

सध्या आयजीएममध्ये कोरोना उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घटले आहे. आयजीएम रुग्णालयातील वर्दळ थंडावली आहे. उपचारासाठी असलेले दहापैकी 5 वॉर्ड बंद केले आहेत. यावरून आयजीएमवरील कोरोनाचा ताण कमी झाल्याचे स्पष्ट होते. कोरोनाचा आयजीएमवरील कमी होणारा ताण शिरोळ, हातकणंगले तालुक्‍यातील सामान्य रुग्णांना धीर देणारा आहे.

कोरोनापासून आजपर्यंत नॉन कोविड उपचारासाठी सामान्यांचे होणारे हाल आता आयजीएममुळे थांबू शकतात. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होईल तसा सामान्यांच्या आशा पल्लवीत होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सामान्य रुग्णांना नॉन कोविड उपचारासाठी आयजीएमची प्रतीक्षा लागलेली आहे. 

आयजीएम कोरोना सद्यस्थिती 
- वॉर्ड - 5 
- उपचार घेणारे -27 
- कोरोनाबाधित -24 

नॉन कोविड उपचार सुरू केले जातील
कोरोनाचा आयजीएमवरील ताण कमी झाला आहे. उपचारासाठी बहुतांश वॉर्ड बंद केले असून रुग्णांची वर्दळ थांबली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार आयजीएममध्ये नॉन कोविड उपचार सुरू केले जातील. 
- डॉ. आर. आर. शेटे, वैद्यकीय अधीक्षक, आयजीएम 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Madhuri the elephant, whose rehabilitation at Vantara is being sought again by PETA India through the Supreme Court
Gokul Milk Union Election Mahayuti Seat-Sharing Formula
Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Marathi News Esakal
www.esakal.com