उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार राजीव आवळे करणार राष्ट्रवादी प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

राष्ट्रवादी काँग्रेस देईल ती जबाबदारी पेलणा

इचलकरंजी (कोल्हापूर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहे. त्यानंतर पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडेन. या निर्णयाला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजीव आवळे यांनी आज व्यक्त केली.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी आमदार आवळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याची चर्चा सोशल मीडियातून रंगली होती. या पार्श्‍वभूमीवर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नगरसेवक अब्राहम आवळे उपस्थित होते.

माजी नगराध्यक्षांचा होणार प्रवेश
आजी आमदार आवळे यांच्यासह पेठवडगावच्या माजी नगराध्यक्षा लता सूर्यवंशी यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांचा एक व्यापक मेळावा घेणार असून प्रांतिक उपाध्यक्षा प्रविता सालपे व सदस्य मदन कारंडे यांचे सहकार्य मिळत असल्याचे श्री. आवळे यांनी या वेळी सांगितले.

 

इचलकरंजीत एकी करणार
इचलकरंजीत राष्ट्रवादीमध्ये कारंडे व जांभळे अशा दोन भरभक्कम गटात राष्ट्रवादी काँग्रेस विभागली आहे. या संदर्भात विचारल्यानंतर आवळे यांनी दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA of Jansurajya Shakti Party Awale joins NCP