esakal | दिलासादायक : इचलकरंजीतील 'तो' चार वर्षांचा बालक झाला कोरोना मुक्त....
sakal

बोलून बातमी शोधा

four year old boy from Ichalkaranji became a corona free

कोले मळ्यातील 70 वर्षीय वृध्दाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या चार वर्षाच्या नातवाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

दिलासादायक : इचलकरंजीतील 'तो' चार वर्षांचा बालक झाला कोरोना मुक्त....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी - येथील कोले मळ्यातील चार वर्षाचा मुलगा आज कोरोनामुक्त झाला आहे. त्याचा दुसरा व तिसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याच्यावर येथील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. यामुळे इचलकरंजीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोले मळ्यातील 70 वर्षीय वृध्दाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या चार वर्षाच्या नातवाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे वस्त्रनगरी हादरली होती. यातील वृध्दाचा 30 एप्रिल रोजी सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला होता. तर त्याचा नातू असेलल्या चार वर्षीय मुलांवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याचा दुसरा व तिसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे हा मुलगा आता कोरोनामुक्त झाला आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात त्याच्या सेवेसाठी त्याची आई होती. आईचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या मुलावर बालरोग तज्ञ डॉ.शोएब मोमीन, डॉ. संदीप मिरजकर उपचार करीत होते. आज दुपारी या मुलाला आता घरी सोडण्यात येणार असल्याचे समजते.

go to top