'जयंतीचा खर्च टाळला, माणुसकीचा धर्म पाळला'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020


एक टन धान्याचे वाटप : मेस्त्रीगल्ली मंडळाचा उपक्रम

निपाणी - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाउनची कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यामुळे मेस्त्रीगल्ली तरुण मंडळाच्या वतीने हनुमान जयंती उत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव रद्द करून  शासनाच्या आदेशाचे पालन केले आहे. सध्याच्या आपत्तीच्या काळात गरीब नागरिकांची गरज लक्षात घेऊन २०० कुटूंबाला १ टन धान्य आणि २०० किलो भाजीपाला मोफत वाटप करण्यात आला. तसेच नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले. जयंतीचा खर्च टाळून माणुसकीचा धर्म पाळत अडचणीमधील लोकांसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे शहरातून कौतूक होत आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने दरवर्षी मंडळातर्फे मोठ्या प्रमाणावर रक्कम खर्च केला जात. पण यावर्षी लॉकडाउनमुळे सार्वजनिक ठिकाणी शिवजयंती साजरी केलेली नाही. प्रशासनाला सहकार्य करत कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी शिवजयंती साजरी करून बचत केलेल्या रक्कमेतून सामान्य कुटुंबीयांना धान्य आणि भाजीपाला दिल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुकुमार पोटले यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब सावरकर, सचिव सचिन शिंत्रे, कैलास पारळे, प्रशांत नरके, अभिजीत म्हातुकडे, प्रसाद पारळे, अजित कोपर्डे, सचिन शिंत्रे, प्रशांत करनुरे, सुनील सावरकर, अविनाश शिंदे, सागर  मंगसुळे, राहुल खामकर, सागर मंगसुळे, संदीप खाडे, राजू नरके, प्रशांत करनुरे, मनोज चव्हाण यांच्यासह मेस्त्रीगल्ली तरुण मंडळाचे सर्व सभासद सार्वजनिक अंतराचे भान ठेवून उपस्थित होते.

 

'कोरोनामुळे अनेक गरीब कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यांना मदतीचा हात देऊन खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी झाली. त्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांना झालेले समाधान वेगळे आहे.'
- सुकुमार पोटले,
अध्यक्ष, मेस्त्रीगल्ली तरुण मंडळ
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free distribution of grains and vegetables keeping in view the needs of poor citizens in nipani