गडहिंग्लजला 4500 विद्यार्थी "रेंज'बाहेर! 

In Gadhinglaj 4500 Students Do Not Have Smart Phones Kolhapur Marathi News
In Gadhinglaj 4500 Students Do Not Have Smart Phones Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उद्यापासून (ता.15) विद्यार्थ्यांविना शाळेची घंटा वाजणार आहे. शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून ऑनलाईन शिक्षणावर भर देण्याच्या सूचना आहेत; पण तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या जवळपास निम्म्या म्हणजे चार हजार 611 विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ऍन्ड्रॉइड मोबाईल नाही. त्यामुळे हे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून दूरच राहणार आहेत. त्यांच्यासाठी शिक्षण विभागाने तूर्तास घरपोच स्वाध्याय देण्याचे नियोजन केले आहे. पण, त्याची अंमलबजावणी कशी होते, हा प्रश्‍नही महत्त्वाचा आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबलेला नाही. त्यामुळे शाळा नियोजनानुसार सुरू करायच्या की, नाही याचा बराच घोळ सुरू होता. अखेर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विद्यार्थ्यांविना शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जाणार आहे. गडहिंग्लज तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या 128 शाळा आहेत.

यामध्ये नऊ हजार 457 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ऑनलाईन शिक्षणात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील दुवा म्हणून ऍन्ड्रॉईड मोबाईल काम करणार आहे. स्वाध्याय, व्हिडिओसह अन्य शैक्षणिक माहिती या माध्यमातूनच विद्यार्थ्यांपर्यंत पोचविली जाणार आहे. पण, तालुक्‍यातील चार हजार 611 विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ऍन्ड्रॉईड मोबाईल नसल्याने ते ऑनलाईन शिक्षणापासून दूरच राहणार आहेत. त्यांना शिक्षण कसे द्यायचे, हा प्रश्‍न आहेच. यावर उपाय म्हणून तूर्तास स्वाध्यायाची प्रिंट काढून विद्यार्थ्यांच्या घरपोच करण्याचे नियोजन आहे. पण, त्या दररोज द्यायच्या की आठवड्यातून एकदा याबाबत स्पष्टता नाही. तालुक्‍यात काही एबीएल शाळा आहेत.

या शाळांतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एबीएल वाचन कार्ड दिली जाणार आहेत. ऑनलाईन शिक्षणातील कसर भरून काढण्याचे नियोजन केले आहे. पण, त्याची अंमलबजावणी कशी होते आणि विद्यार्थ्यांकडून त्याला प्रतिसाद कसा मिळतो, यावरच शैक्षणिक भवितव्य अवलंबून आहे. 

पालकांची भूमिका महत्त्वाची... 
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या गडहिंग्लज तालुक्‍यातील चार हजार 846 विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ऍन्ड्रॉइड मोबाईल आहेत. शाळेत इयत्तानिहाय बनविलेल्या ग्रुपवर स्वाध्याय टाकला जाणार आहे, तर ऍन्ड्रॉइड नसलेल्या विद्यार्थ्यांना स्वाध्यायची प्रिंट काढून दिली जाणार आहे. पण, दिलेला स्वाध्याय पूर्ण केला जातो की नाही. तो कशा पद्धतीने केला जातो, यावर पालकांना लक्ष ठेवावे लागणार आहे. शिवाय ऑनलाईन दिलेल्या स्वाध्यायची तपासणी कशी होणार, हे स्पष्ट नाही. त्यामुळे कोरोनाने बदललेल्या शिक्षण प्रक्रियेत शिक्षक सोबत नसताना पालकांचीच भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com