गडहिंग्लजला लिंबूचे दर वधारले

Gadhinglaj Market increased lemon prices Kolhapur Marathi News
Gadhinglaj Market increased lemon prices Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : येथील भाजी मंडईत मागणी वाढल्यामुळे लिंबूचे दर वधारले आहेत. सोयाबीनच्या दरात घट झाली आहे. हिरवी मिरची, काकडीची मागणी कायम असल्याने दर टिकून आहेत. भुईमूगाला चांगला दर असूनही स्थानिक उत्पादन कमी झाल्याने आवक नाही. जनावरांच्या बाजारात शेळ्या-मेंढ्यांचे भाव वाढले असून म्हशींची आवक टिकून आहे. फळ बाजारात द्राक्षांची आवक कायम आहे. 

वाढत्या उन्हाळ्यामुळे लिंबूची आवक कमी झाली आहे. मागणी मात्र कायम असल्याने दर वधारले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत शेकड्यामागे 100 ते 200 रुपयांनी दर वाढले आहेत. 100 लिंबूना 250 ते 300 रुपये असा भाव आहे. किरकोळ बाजारात आकारानुसार तीन ते चार रुपये असा एका नगाचा दर आहे. भाजी मंडईत वांगी, टोमॅटो यांची सर्वाधिक आवक असल्याने दर घसरलेले आहेत. तुलनेत हिरवी मिरची, काकडी यांची आवक कमी असल्याने दर अधिक आहेत. दहा किलोचे दर असे- ढबू, कारली 150, दोडका 200, हिरवी मिरची, काकडी 300, टोमॅटो 50, वांगी 100, फ्लावर 100 ते 120, कोबी 50 रुपये. 

सोयाबीनच्या दरातील घसरण गेल्या दोन महिन्यापासून कायम आहे. जानेवारीत 300 तर फेब्रुवारीतही 300 असा एकूण 600 रुपयांनी दर घसरला. 3800 रुपये क्विंटल असा दर असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात आणणे थांबविले आहे. भुईमूगाचा 4500 ते 4600 रुपये क्विंटल असा दर आहे. स्थानिक आवक नाही. फळ बाजारात सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या द्राक्षांची आवक कायम आहे. 40 ते 60 रुपये किलो असा दर आहे.

कलिंगडाची मागणी कायम असून आकारानुसार 30 ते 100 रुपयापर्यंत दर आहेत. संत्री, डाळिंब, पेरू 60 रुपये किलो आहेत. जनावरांच्या बाजारात शेळ्यामेंढ्यांना अधिक मागणी आहे. परिसरात असणाऱ्या यात्रा, जत्रामुळे दरही वधारले आहेत. 4 ते 10 हजारापर्यंत दर आहेत. शेळ्यांची 150 हून अधिक आवक झाली. म्हशींची 100 हून अधिक आवक होऊन 25 ते 90 हजारापर्यंत दर असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. 

मटणाचा दर वाढला 
कोरोनाच्या भितीमुळे चिकनची मागणी घसरली आहे. दर उतरूनही ग्राहकांनी मात्र त्याकडे पाठ फिरविली आहे. सहाजिकच यामुळे मटणाला मागणी वाढली आहे. मागणी वाढल्यामुळे विक्रेत्यांनी किलोमागे 40 रुपयांनी दर वाढ केली आहे. 540 रुपये किलो असा दर आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com