गडहिंग्लजला नवी नियमावली, बाजारपेठ होणार दोन तास आधीच बंद आणि दर मंगळवारी लॉकडाऊन

Gadhinglaj New Regulations, The Market Will Be Closed Two Hours In Advance And Lockdown Every Tuesday Kolhapur Marathi News
Gadhinglaj New Regulations, The Market Will Be Closed Two Hours In Advance And Lockdown Every Tuesday Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : बाजारपेठेतील दुकाने सुरू ठेवण्याची शासनाने ठरवून दिलेली सध्याची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सात पर्यंतची आहे. मात्र, शहरातील वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेवून व्यापाऱ्यांनी सायंकाळी बंदची वेळ बदलून ती पाचपर्यंत केली आहे. याची अंमलबजावणी उद्यापासून (ता. 4) होणार आहे. दरम्यान, दर मंगळवारी कडक लॉकडाऊन पाळण्याचेही बैठकीत ठरविण्यात आले. 

शहरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे आज व्यापाऱ्यांमध्ये बंदबाबत हालचाली सुरू झाल्या. सोशल मिडीयावर याची चर्चा जोर धरू लागल्याने चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत बंद करण्यावर अनेक व्यापाऱ्यांचे एकमत होवू शकले नाही. काही व्यापाऱ्यांनी बंदला विरोध केला. मुळात लॉकडाऊनमुळे व्यापारी आर्थिक घाईला आला आहे. यामुळे पुन्हा बंद हा पर्याय होवू शकत नाही. त्याऐवजी प्रत्येक दुकानदाराने मास्क घालून न येणाऱ्या ग्राहकांना प्रवेश न देणे, सॅनिटायझरचा सक्तीने वापर आणि सोशल डिस्टन्स या गोष्टींवर भर देणे आवश्‍यक असून या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करूनच व्यवहार सुरळीत ठेवावेत असा विचार मांडला. 

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांचा बंद आवश्‍यक आहे. सध्या कोरोना संसर्गाचा वाढता आलेख पाहता हॉस्पीटलमध्ये बेडसुद्धा मिळणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत व्यापाऱ्यांनीही आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी आणि आठवड्याचा बंद पाळावा, असेही मत बैठकीत व्यक्त झाले. तसेच चार दिवसासाठी प्रायोगिक तत्वावर सकाळी नऊ ते पाच पर्यंतच बाजारपेठ सुरू ठेवून त्यानंतर कडक बंद पाळण्याचा मतप्रवाहही समोर आला. यातून व्यापाऱ्यांनी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंतच बाजारपेठ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. या दोन तासाच्या बंदने काय फरक पडतो, याचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्याचेही यावेळी ठरले. या वेळी बहुतांशी व्यापारी बांधव, नगरसेवक उपस्थित होते. 

...तर दंडात्मक कारवाई 
व्यापाऱ्यांच्या निर्णयानंतर पाच वाजता बंद न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई कोणी करायची, हा प्रश्‍न चर्चेत आला. त्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्समधील पाच पदाधिकाऱ्यांची समिती नियुक्त करून त्यांनी दंडात्मक कारवाई करावी, अशी चर्चा झाली. तसेच विविध व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या व्यापाऱ्यांना ही वेळ पाळण्यासाठी सक्ती करावी, असेही आवाहन केले आहे. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com