कारखाने सुरु करण्यासाठी 'या' आहेत आठ अटी...

The government has given conditional permission to start industrial factories in Belgaum district
The government has given conditional permission to start industrial factories in Belgaum district

बेळगाव - जिल्ह्यातील उद्योगधंदे कारखाने सुरू करण्यासाठी शासनाने सशर्त परवानगी दिली आहे. सोमवारपासून (ता. 4) त्याची अंमलबजावणी होणार आहे. मात्र त्यासाठीच्या नियमावलींचे मात्र व्यावसायिकांनी काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. एकुण आठ अटी यासाठी घालण्यात आल्या असून त्याची पूर्तता करूनच कारखाने सुरू ठेवावे लागणार आहेत.

कारखाने सुरु करण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या संचालकांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. जे कारखाने सुरू ठेवले जाणार आहेत. त्याठिकाणी वेळोवेळी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा उद्योग केंद्राकडून अचानक भेटी देऊन तेथील कामाची पाहणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास अशा कारखाण्यांचे काम तातडीने थांबविले जाणार आहेत. जिल्हा उद्योग केंद्राचे संचालकच नोडल अधिकारी असल्याने कारखाना चालकांनी आपल्या समस्या असल्यास त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कारखाने सुरू करण्यासाठीच्या अटी अशा :

  • बेळगाव जिल्हा ऑरेंज झोन म्हनून ओळखण्यात आला असलयने केंद्र सरकारच्या आदेशान्वये कारखान्यांना "स्टॅंडर्ड ऑपरेशन प्रोसिजर" (एसओपी) ची अंमलबजावणी करावी लागणर आहे.
  • एसओपी केल्याबाबत घोषणापत्र जिल्हा उद्योग केंद्राला द्यावे लागणार आहे. तसेच त्याची एक पत्र कारखान्याच्या नोटीस बोर्डवर चिकटवावी लागेल.
  • कामावर हजर होताना दुचाकीवरुन येणारा कामगार एकटाच येऊ शकतो. डबल सिट चालणार नाही. तसेच चारचाकी वाहन असल्यास त्यातून केवळ तिघे प्रवास करू शकतात.
  • सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून त्याकाळात कामगार प्रवास करू शकणार नाहीत. पण, कारखान्यात ते काम करु शकतात.
  • कामगारांनी प्रवासात तसेच कामाच्या ठिकाणी तोंडाला मास्क वापरणे आवश्‍यक असून सोशल डिस्टंसिंग ठेवून काम करावे.
  • कामाच्या ठिकाणी नियमीत साबणाने हात धुणे तसेच सॅनिटायझरचा वापर करणे आवश्‍यक.
  • कारखाना व्यावसायिकांनी कारखान्याच्या ठिकाणी तसेच स्वच्छता गृहात स्वच्छता राखणे आवश्‍यक
  • जिल्हा प्रशासन आणि जिल्हा उद्योग केंद्राकडून अचानक भेटीच्या वेळी एसओपीचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास कारखान्याचे काम स्थगीत ठेवले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com