esakal | सांगलीत पदवीधर निवडणुकीच्या हालचाली गतिमान
sakal

बोलून बातमी शोधा

Graduate Elections Graduation movement in Jat taluka sangli

पदवीधर मतदारसंघात एखाद-दुसरा अपवाद वगळता भाजपने विजय मिळविला आहे.

सांगलीत पदवीधर निवडणुकीच्या हालचाली गतिमान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली :जत तालुक्यात पदवीधर निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.या निवडणुकीसाठी तालुक्यात पदवीधराची नोंदणी यावर्षी स्वयंस्फूर्तीने दुप्पटीने झाली आहे. निवडणुक जाहीर झाल्याने निवडणुकीचे वेध लागले आहेत.ही निवडणुक शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी,भाजप या पक्षपातळीवर चुरशीने होणार आहे.
    
सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे या जिल्हाचा समावेश असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणुक 1 डिसेंबरला होणार आहे.यावर्षी जत तालुक्यात पदवीधरांनी स्वंयमस्फूर्तेने नोंदणी केली आहे.जत तालुक्यात अरुण अण्णा लाड,सारंग पाटील यांनी पदवीधराची नांव नोंदणी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.जिल्ह्यात पदवीधर साठी 79 हजार 496 मतदार आहेत.जत तालुक्यात 12 हजार मतदार आहेत.

पदवीधर मतदारसंघात एखाद-दुसरा अपवाद वगळता भाजपने विजय मिळविला आहे. या आधी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रतिनिधित्व केले आहे. एकदा भाजपला दणका देत जनता दलाचे प्रा शरद पाटील विजयी झाले होते. मागील निवडणुकीत भाजपचे मंत्री आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी बाजी मारली होती.
 गेल्या निवडणुकीत जत तालुक्यात 6 हजार मतदार होते.राष्ट्रवादी बंडखोर अरुणअण्णा लाड यांना चांगली मते मिळाली होती.राष्ट्रवादी-काँग्रेसचे सारंग पाटील यांच्या मतविभागणीमुळे तालुक्यात भाजपचे आ.चंद्रकांत दादा पाटील यांना किरकोळ आघाडी मिळाली होती.

हेही वाचा- मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार आवाडे यांना दिली अशी  ‘ऑफर’


 या निवडणुकीसाठी भाजपकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जनता दलाचे प्रा शरद पाटील, वंचित बहुजन आघाडीचे प्रा.सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुणअण्णा लाड यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. सध्या फोन काँल,टेक्स्ट मेसेज, वाँटसअपच्या माध्यमातून मतदाराशी संपर्क साधला जात आहे. भाजपा व महाविकास आघाडीच्या प्रमुख दोन्ही उमेदवारांच्या लढतीकडे लक्ष लागून राहिली आहे. देशमुख व लाड या दोन्ही उमेदवाराचे तालुक्यात साखर कारखानाच्या माध्यमातून ऊसतोडणी मुकादम, मजूर यांच्या माध्यमातून संबंध आहेत.त्यामुळे तालुक्यात चुरशीने मतदान होणार आहे.


 

मागील निवडणूकीतील प्रमुख उमेदवार व मते: 

उमेदवार                  पक्ष       मिळालेली मते चंद्रकांतदादा पाटील.                    भाजप.   61453

सारंग पाटील.            राष्ट्रवादी  59073

अरुणअण्णा लाड.  राष्ट्रवादी बंडखोर. 37189

शैला गोडसे.             अपक्ष.          10594

प्रा शरद पाटील.      जनता दल.         8519


 

पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी तब्बल 62 उमेदवार यंदा आमदार होण्यासाठी निवडणुकीत तरुणांचा कौल मागत आहेत. यापैकी 12 उमेदवार हे पक्षाकडून आहेत तर अपक्ष उमेदवारांची संख्या 50 इतकी आहे. मोठया संख्येने उभे ठाकलेले कुणासाठी हितकारक व कुणासाठी मारक ठरतात हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. पदवीधर मतदारसंघामधील आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. तर राष्ट्रवादि काँग्रेसने पदवीधर मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. याशिवाय अन्य उमेदवार मोठया संख्येने मैदानात उतरल्याने निवडणुकीत रंग भरू लागला आहे.  

संपादन- अर्चना बनगे