शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, स्वसंरक्षणाची गुरूकिल्ली 

Greater than strength, the key to self-defense
Greater than strength, the key to self-defense

कोल्हापूर :  कोणत्याही अटीतटीच्या प्रसंगी महिला, तरूणींना शक्तीचा वापर करता येत नसल्यास युक्तीचा वापर करून स्वतःचा बचाव करू शकतात.

आव्हानात्मक परिस्थितीत छोट्याशा टेक्‍निकमधून स्वसंरक्षणाचा धडा गिरवण्याची गरज आहे. बसमध्ये गर्दीतून प्रवास करताना किंवा वडापमधून जाताना कधी कधी चोरटे स्पर्श, छुप्या छेडछाडीचा सामना करावा लागतो, अशा वेळी उपलब्ध वस्तूंमधून स्वतःचा बचाव करता येऊ शकतो. काही युक्‍त्या वापरून स्वसंरक्षणाची ही गुरूकिल्ली सध्या निर्भया पथकासह स्वसंरक्षण शिबीरे राबविणाऱ्या संस्था, संघटनाकडून दिली जात आहे. 

तुम्ही बसमधून प्रवास करत आहात. शेजारी उभा असलेला एखादा व्यक्ती तुम्हाला जाणतेपणाने स्पर्श करतो आहे. ही गोष्ट लक्षात आल्यास त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवा. असे वारंवार घडत असल्यास पर्समध्ये किंवा ओढणीला लावलेली सेफ्टीपिन घ्या. ती पिन त्या व्यक्तीला दुखेल अशा पद्धतीने हळुच टोचा. तसेच एखादा व्यक्ती तुमच्यावर समोरून हल्ला करत असेल तर केसातील खेकडा पिन काढून त्याच्या नाकावर लावा. अचानक झालेल्या या प्रतिकारामुळे तो व्यक्ती गोंधळून जाईल व तुम्हाला अशा परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी थोडा वेळ उपलब्ध होईल. अशा प्रकारच्या अनेक युक्‍त्या वापरून महिला, मुली स्वसंरक्षणास सिद्ध होऊ शकतात. तसेच नेहमी आपल्या पर्समध्ये किंवा कायम सोबत असलेल्या वस्तूंपासून तुम्ही बचाव करू शकता. हाच मंत्र सध्या महिला, मुलींना दिल्या जाणाऱ्या स्वसंरक्षण शिबीरात दिला जात आहे. 

बस स्टॉप, रेल्वे प्रवास, बस प्रवास, भाजी मंडई, गर्दीच्या ठिकाणी, रिक्षामध्ये, लिफ्टमध्ये, उद्यानात किंवा कोणत्याही असुरक्षित ठिकाणी महिला, मुलींना चोरट्या स्पर्शांचा सामना करावा लागतो. त्यावेळी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून स्वसंरक्षण करता येते. 
- सतीश वडणगेकर, प्रशिक्षक 

या आहेत वस्तू 
- सेफ्टी पिन, खेकडा पिन, पाण्याची बॉटल, पेन, मोबाईल, ओढणी, नोटबुक, कंगवा, छत्री, आयडी कार्ड, स्प्रे, ओढणी. 

चेन स्नॅचिंगपासूनही बचाव 
सध्या चेन स्नॅचिंगचे प्रमाण वाढते आहे. मॉर्निंग वॉक किंवा रस्त्यावरून जाताना गळ्यातील चेन हिसकावली जाते. हे टाळण्यासाठी चेन किंवा मंगळसुत्रामधील साखळीमध्ये सेफ्टी पिन अडकवायची. ती पिन कपड्यांनाही लावायची. ही चेन ओढल्यास त्वरीत जाणीव होऊन हा प्रसंग टाळता येतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com