प्लिज माझ्या आईला घरी पोहचवा ; लेह मधील जवानाची ऐकली हाक 

help to soldiers mother by police and medical officer in belgum
help to soldiers mother by police and medical officer in belgum

बेळगाव - देशसेवेसाठी देशाच्या सीमा रेषेवर कार्यरत असणाऱ्या जवानांनाही आपल्या कुंटुबाची मोठी काळजी लागुन राहिली आहे. तसेच प्रत्येक जवानाच्या नजरा आपल्या घराकडे लागुन राहिल्या आहेत.  सध्या लेह येथे तैनात असलेल्या एका जवानाने आई वडीलांच्या काळजीपोटी कोरोनासाठी बेळगावात सुरु करण्यात आलेल्या हेल्प लाईनशी संपर्क साधला.  आईला आपल्या गावाकडे सोडुन येण्याची त्याने विनंती केली. त्यानंतर शनिवारी आरोग्य विभाग आणि पोलीसांनीही तातडीने पावले उचलत जवानाच्या आईला गावापर्यंत सोडले आहे. 

हलशी येथील नारायण भेकणे लष्करात असुन सध्या लेह येथे त्याची पोस्टींग आहे. अनेक महिने सुट्टीवर न आल्याने तो 19 तारखेपासुन सुट्टीवर येणार होता. मात्र कोरोनामुळे विमान सेवा बंद ठेवण्यात आल्याने त्याला सुट्टीवर येता आले नाही. मात्र नारायण यांच्या आई यल्लुबाई भेकने या काही दिवसांपुर्वी बेळगावला आपल्या मुलीकडे आल्या होत्या व नारायण सुट्टीवर आल्यानंतर त्याच्या सोबत जाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र कोरोनामुळे सुट्टी रद्द झाल्याने नारायण येऊ शकला नाही तर दुसरीकडे बस सेवा पुर्णपणे बंद झाल्याने त्याच्या आईला हलशीला जाता येत नव्हते. त्यामुळे आई व लेहमध्ये असलेल्या नारायणला गावाकडे असलेल्या वडिलांची काळजी सतावु लागली होती. 

अनेक दिवसांपासुन घराकडे जाता येत नसल्याने त्याची आई दिवसभर रडत बसायची त्यामुळे नारायणलाही काय करावे कळावे लागत नव्हते.विवंचनेत सापडलेल्या नारायण याने लेह येथुन हेल्प लाईनशी संपर्क साधला आणि सर्व परिस्थिती कथन केली व आईला घरी सोडण्याची विनंती केली. त्यानंतर आरोग्याधिकारी डॉ. बी. एन. तुक्‍कार यांनी पोलीसांशी संपर्क साधला. हलशीपर्यंत जवानाच्या आईला सोडण्याची सुचना केली त्यांनतर पोलीसांनी त्यांना सुखरुपपणे घरी पोहचविले आहे. त्यामुळे देशसेवेसाठी लेह येथे असलेल्या जवानाची चिंता मिटली आहे. 
 
जवाानाची हाक ऐकली

लेह येथे कार्यरत असलेल्या नारायण यांनी जवानाची हाक आरोग्य अधिकाऱ्यांनी ऐकल्याबाबत समाधान व्यक्‍त केले असुन आरोग्याधिकारी डॉ. बी. एन. तुक्‍कार यांनी जवानाच्या बोलण्यावरुन त्याची तळमळ आणि काळजी दिसुन येत होती त्यामुळेच तातडीने त्यांच्या आईला घरी सुखरुपणे पोहचविण्यात आले अशी माहिती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com