उच्च न्यायालयात बाजू मांडताना न्यूनगंड नको

In the High Court, there should not be a lower opinion
In the High Court, there should not be a lower opinion
Updated on

कोल्हापूर : उच्च न्यायालयात बाजू मांडताना मनात न्यूनगंड ठेवू नका, उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती हे विशेष करून ज्युनिअर वकिलांना निश्‍चित मदत करण्याच्या भूमिकेत असतात. उच्च न्यायालयात वकिली करताना न घाबरता न्यायमूर्तींसमोर जावा, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलवडे यांनी आज येथे दिला.

ऍडव्होकेटस्‌ ऍकॅडमीतर्फे वकिलांसाठीच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. व्ही. व्ही. जोशी अध्यक्षस्थानी होते. 

उच्च न्यायालयाला घटनेने कलम 226 प्रमाणे प्राप्त अधिकार व त्याचे महत्त्व सांगून न्यायमूर्ती नलवडे म्हणाले, ""लवाद, शासकीय विभाग, पोलिस यंत्रणा व सरकार यांच्या विरुद्ध दाद मागणेचा मार्ग उपलब्ध आहे. घटनेचे कलम 227 अंतर्गत उच्च न्यायालयालास मिळालेल्या अधिकारही महत्त्वाचे आहेत.'' 

गोवा सरकारचे ऍडव्होकेट जनरल ऍड. देवीदास पांगम म्हणाले,""उच्च न्यायालयात वकिली करत असताना प्रत्येक खटल्यामधील विस्तुस्थिती व त्या अनुषंगाने असलेला कायदा, त्यासंदर्भाचे लिखाण करीत असताना कोणतीही बाजू 
न्यायालयापासून लपवून न ठेवता पिटीशनचे लिखाण केले पाहिजे.'' 
सत्र न्यायाधीश सौ. जोशी यांनी उच्च न्यायलयात वकिली करतानाचे स्वतःचे अनुभव सांगितले. उच्च न्यायालयात वेळ पाळावी लागते, तसेच हजरजबाबीपणा पाहिजे, असेही स्पष्ट केले. शिबिरात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ऍड. अनिल साखरे, सीनिअर कौन्सिलर ऍड. अशोक मुंडरगी, ज्येष्ठ विधीज्ञ अभय नेवगी आणि युवराज नरवणकर यांची व्याख्याने झाली. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य ऍड. पारिजात पांडे, संग्राम देसाई, जिल्हा सरकारी वकील विवेक शुल्क, सिंधुदुर्गचे जिल्हा सरकारी वकील संतेश तायशेटे यांच्यासह राज्यातील वकील, लॉ कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. ऍकॅडमीचे अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ पाटकर यांनी प्रास्ताविक केले. ऍड. डॉ. संतोष शहा यांनी मनोगत व्यक्त केले. ऍड. अमीर शेख यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com