होस्टेल, रूममध्ये राहणाऱ्यांना टोळक्‍यांचा उपद्रव 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

कोल्हापूर : शहरासह उपनगरातही शैक्षणिक संस्थांचे जाळे विस्तारले आहे. ग्रामीण भागातील मुली शालेय, महाविद्यालय, वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रम शिकण्यासाठी उपनगरात राहतात. परिसरातील शैक्षणिक संस्थात शिक्षण घेतात. त्यासाठी संस्थांच्या हॉस्टेल्स्‌मध्ये तर काही विद्यार्थिनी कॉट बेसिसवर रूम्स मध्ये रहातात. शिक्षणासाठी त्या घरापासून लांब असलेल्या शिक्षण संस्थेत जाताना या विद्यार्थिंनीना समाजातील काही अपप्रवृत्ती व टोळक्‍यांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागते. 

"सकाळ' ने छेडछाडी विरोधात केलेल्या व्यक्त व्हा या आवाहनाला प्रतिसाद देत हॉस्टेल व रूमवर राहणाऱ्या विद्यार्थिंनीनी त्यांच्या व्यथा मांडल्या. लाईन बझार परिसरातील कॉट बेसिसवर राहणाऱ्या मुलींनी यावर प्रकाश टाकत टोळक्‍यांकडून होत असलेला त्रास "सकाळ' च्या माध्यमातून व्यक्त केला. येथील एका मैदानावर गेले काही महिने 10 ते 15 जणांचे टोळके असते. परिसरातील महाविद्यालयीन तरूणी, महिला तसेच लहान मुलींचीही येता जाता चेष्टा करणे हा त्यांचा नित्यक्रम बनल्याचे या परिसरातून सांगण्यात आले. 

या परिसरात महिलांसाठी काही खाजगी होस्टेल्सही आहेत. रोजच होणाऱ्या त्यांच्या त्रासाबद्दल येथील ज्येष्ठ नागरिकांनाही हा प्रकार त्यांनी सांगितला. ज्येष्ठ नागरिकांनी या प्रकाराला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्यापुरता हा प्रकार थांबतो व पुन्हा काही दिवसानंतर हा त्रास पुन्हा सुरू होतो. या टोळक्‍यात अल्पवयीन मुलांसह तरूणांचाही समावेश असल्याचे तरूणी सांगतात. दुपारच्या वेळी रस्त्यावर फारशी रहदारी नसताना हे टोळके या मैदानावर जमते. रात्री दहानंतरही मोठ्याने ओरडून त्रास देणे सुरूच राहते. शिक्षणाच्या ध्यासाने शहरात राहणाऱ्या या तरूणींना असे प्रसंग अनुभवायला येतात. या घडणाऱ्या प्रकाराबद्दल घरी सांगायचे तर शिक्षण बंद होण्याची भिती त्यामुळे घरीही अशा घटना सांगितल्या जात नाहीत. रात्रीच्या वेळीही तरूणांकडून होणाऱ्या त्रासामुळे अभ्यासातही लक्ष लागत नाही. त्यामुळे अशा टोळक्‍यांवर अटकाव घालण्याची मागणी या तरूणी - महिलांकडून होऊ लागली आहे. 
 
होणारा त्रास 
- रात्रीचे टायर पेटवून बसणे 
- मोठमोठ्याने ओरडणे 
- शिवीगाळ करणे 
- अश्‍लील बोलणे 
- मैदानावर फिरायला जाणाऱ्या महिलांची चेष्टा करणे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hostel, gang rape to people living in the room