अशी झाली जोतिबाची नगरप्रदक्षिणा,अकरा ग्रामस्थांची उपस्थीती, भाविकांना परवानगी नाकारली

This is how the procession of Jyotiba took place, the presence of eleven villagers, the devotees were denied permission.
This is how the procession of Jyotiba took place, the presence of eleven villagers, the devotees were denied permission.

जोतिबा डोंगर ः  श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर (ता.पन्हाळा) येथे दरवर्षी तिसऱ्या श्रावण सोमवारी निघणारी जोतिबाची नगर प्रदक्षिणा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आज केवळ अकरा ग्रामस्थ पुजारी यांनी काढून या नगर प्रदक्षिणेची परंपरा कायम ठेवली. जिल्हात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा या दिंडीला कोणत्याही ग्रामस्थ भाविकाला परवानगी दिलेली नाही. 
यंदा डोंगरावर दोन्ही यात्रा रद्द झाल्या. नगर प्रदक्षिणा (दिंडी) निघावी, यासाठी काही लोकप्रतिनिधी ग्रामस्थ पूजारी पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अमित माळी यांना भेटले. त्यांनी केवळ अकरा लोकांनी ही दिंडी काढावी, अशी परवानगी दिली. 
त्यानुसार आज सकाळी सर्व वैयक्तीक अंतराचा पाळून जोतिबाच्या मुख्य मंदिरातून ही अकरा लोकांची नगर प्रदक्षिणा मंदिरातून दक्षिण दरवाजातून गाय मुख तलाव या ठिकाणी आली. येथे श्रीशैल मलिकार्जुन मंदिरात अभिषेक व धार्मिक विधी झाले. त्यानंतर ही दिंडी व्याघ्र तीर्थ, मंडोकतीर्थ, पांढरबन, नागझरी अशा या अष्टतीर्थचे दर्शन घेऊन भिमा शंकर तिर्थावर गेली तेथे विविध धार्मीक विधी झाले. त्यानंतर दिंडी जमनाचीवाडी मार्गे वीजकडा मार्गे गिरोली (ता. पन्हाळा) गावातील निनाई देवी मंदिरात आली. येथे असणाऱ्या मंदिरात अभिषेक आरती सोहळा झाला. त्यानंतर दिंडी पोहाळे तर्फ आळते येथील पांडवलेणी असणाऱ्या औंढा नागनाथ या तिर्थावर नगर प्रदक्षिणा आली. तिथे विविध कार्यक्रम झाले. त्यानंतर दुपारी ही दिंडी पुन्हा गायमुख मार्गे जोतिबा डोंगरावर आली आणि या नगर प्रदक्षिणा सोहळ्याची सांगता झाली. दरम्यान या दिंडीत कोणीही भाविक सहभागी होऊ नये, म्हणून कोडोली पोलीस ठाण्याचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com