तंबाखूचे व्यसन सोडायचे आहे, मग ही बातमी नक्की बाचा! असे सुटू शकते तंबाखूचे व्यसन

शिवाजी यादव
रविवार, 31 मे 2020

तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनात अडकलेल्या असंख्य व्यक्ती व्यसनमुक्त होण्याचे पर्याय शोधत आहेत. अनेकजण उपचार घेतात. अनेकजण उपचार मध्येच सोडतात, तर अनेकजण उपचारच घेत नाहीत, अशा तीन अवस्थेतील व्यक्ती ठळक दिसतात. त्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी होमिओपॅथिक औषधे व समुपदेशनाद्वारे व्यसनमुक्त करता येते,

कोल्हापूर ः लाला रोज बसता उठता तंबाखूचा फखणा मारायचे. तासन्‌तास तंबाखूच्या धुंदीत दंग होताना त्यांना बुद्धी तल्लख झाल्याचा "फिल' यायचा. तसे ते तंबाखूच्या व्यसनात दिवसागणिक गढून गेले. तंबाखूचे अतिसेवन आरोग्याला हानिकारक आहे, हेही त्यांना पटत होते म्हणून त्यांनी नाना औषधे घेऊन पाहिली तरी व्यसन सुटेना झाले. अशा अनेक तंबाखू व्यसनीपैकी प्रातिनिधिक रूप म्हणजे लाला होय, असे व्यसन भक्कम मनोनिग्रहाद्वारे सोडता येते. त्यासाठी 80 टक्के समुपदेशन आणि 20 टक्के औषध उपचाराद्वारे व्यसन सुटणे शक्‍य असल्याचा दावा होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. स्वप्नील पवार यांनी दै. "सकाळ'शी बोलताना केला. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनात अडकलेल्या असंख्य व्यक्ती व्यसनमुक्त होण्याचे पर्याय शोधत आहेत. अनेकजण उपचार घेतात. अनेकजण उपचार मध्येच सोडतात, तर अनेकजण उपचारच घेत नाहीत, अशा तीन अवस्थेतील व्यक्ती ठळक दिसतात. त्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी होमिओपॅथिक औषधे व समुपदेशनाद्वारे व्यसनमुक्त करता येते, असे सांगून डॉ. पवार म्हणाले, ""तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनातून सेंट्रल नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होतो. काही वेळा नशा असल्याचा फिल येतो. त्यातून तणाव कमी झाल्याचे भासते, म्हणून काहीजण वारंवार तंबाखू सेवन करतात. त्यातून सातत्य आले की, तंबाखूची सवय जडते. सतत तंबाखू सेवन अथवा धूम्रपानाचा आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्‍यता वाढते, यात कर्करोगही होऊ शकतो.'' असे सांगून ते म्हणाले की, "" तंबाखू व्यसनीला तंबाखू मिळाला नाही की, मनाची चलबिचल वाढते, भीती वाटते, तंबाखू खाल्ला नाही, तर काही आजार होईल, अशी भीती वाटते. तेव्हा अनेकांची व्यसनाची संगत अधिक घट्ट होते. अशात ही वेळा काहीजण तंबाखू सोडण्याचा प्रयत्न करतात किंवा अचानकपणे व्यसन सोडले तरी काहीची आणखी चलबिचल वाढते आणि काहीजण व्यसन सोडण्याचा प्रयत्न मध्येच सोडतात.'' 

हे पण वाचा - जगाला कोरोनापासून तर कोल्हापुरातील शेतकऱ्यांना आहे या प्राण्यापासून धोका
 

काही वेळा व्यसन करताना तंबाखूतील विष शरीरात भिनलेले असते. ते बाहेर पडताना किंवा व्यसन सोडताना भीती वाढते, मानसिक धक्का, थकवा येणे, रक्तदाब वाढणे, खोकला येणे, निद्रानाश होणे, अपचन होणे, तीव्र डोकेदुखी अशी लक्षणे दिसू शकतात, मात्र सर्व लक्षणे सर्वांनाच असतील, असे नाही. यापैकी एक दोन लक्षणे तीव्र होऊ शकतात. तेव्हा अनेक व्यक्ती तंबाखूजन्य व्यसनाच्या गर्तेत अधिक सापडतात. असेही डॉ. पवार यांनी सांगितले. वरील सर्व स्थिती पाहता तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी व्यसन सोडण्यासाठी मनोनिग्रह महत्त्वाचा आहे, तो समुपदेशनातून तयार होऊ शकतो. त्याला औषधांची जोड लाभली तर संबंधित व्यक्तीने समुपदेशन व औषधखान्याला प्रतिसाद दिला त्यात सातत्य ठेवले तर या तीव्र व्यसनापासून सुटका होणे शक्‍य आहे. 

हे पण वाचा - येथे ओशाळली माणुसकी ; धडक देवून गेला निघून, गमवावा लागला एका निष्पापाला जीव
 

दिवसाला 70 हजार पुड्यांची विक्री 
तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांकडून मिळालेली माहिती अशी की, तंबाखूजन्य पदार्थ विक्रीची पानपट्ट्या व दुकाने जवळपास जिल्ह्यातील अंदाजे 2500 आहेत. एका दिवसात कमीत कमी 20 ते 50 तंबाखूपुडी खपतात, असा जवळपास 50 ते 70 हजारांवर पुड्यांची अंदाजे विक्री होते. किमान एक लाखांच्या आसपास व्यक्ती तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत असल्याचे जाणवते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is how tobacco addiction can be overcome