esakal | इचलकरंजीत कांद्याची आवक ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत कांद्याची आवक ठप्प

पडणाऱ्या पावसामुळे भाजीपाल्याचे भाव चांगलेच भडकले आहेत. कांद्याने प्रतिकिलो 100 रुपयापर्यंत मजल मारली असून, अन्य भाजीपाला 50 च्या पुढे आहे.

इचलकरंजीत कांद्याची आवक ठप्प

sakal_logo
By
पंडित कोंडेकर

इचलकरंजी : पडणाऱ्या पावसामुळे भाजीपाल्याचे भाव चांगलेच भडकले आहेत. कांद्याने प्रतिकिलो 100 रुपयापर्यंत मजल मारली असून, अन्य भाजीपाला 50 च्या पुढे आहे. शहरातील वडगाव बाजार समितीत कांद्याची आवक ठप्प झाली असून, सध्या केवळ 180 पोती कांदा शिल्लक आहे. भाव वाढल्याने कांद्याच्या मागणीकडे व्यापारीही पाठ फिरवत आहेत. खाद्यतेल व कडधान्याचे दर स्थिर आहेत, मात्र तूरडाळीचे दर वाढले असून 115 रुपये किलो आहे. फळ बाजारात फळांची आवक चांगली आहे.

प्रति किलो रुपये भाजीपाला : टोमॅटो- 50, दोडका- 80-100, वांगी- 100-120, कारली-80, मिरची-60-70, फ्लॉवर-60, कोबी- 60, बटाटा-50, कांदा-100, लसूण-160, आले-180, लिंबू- 200 ते 250 डझन, गाजर-80, रताळ-30, बिन्स-100, वरणा शेंगा-80, सर्व प्रकारच्या पालेभाज्या 15 ते 20 रुपये. 

खाद्यतेल : शेंगतेल-150, सरकी-103, सोयाबीन-104, सूर्यफूल-105 , पामतेल-97. 
फळे : सफरचंद-50 ते 140, संत्री-120 ते 140, मोसंबी-50 ते 70, सीताफळ-20 ते 70, डाळिंब-60 ते 140, चिकू-60 ते 80, आम्रफल-150, अलूबुकर-200-300, केळी-25 ते 30 रुपये डझन. 

कडधान्य : ज्वारी-20 ते 29, बार्शी शाळू- 28 ते 48, गहू- 22 ते 30, हरभराडाळ - 72, तूरडाळ- 115, मूगडाळ-90 ते 93, मसूरडाळ-70, उडीदडाळ- 100 ते 110, मूग-85 ते 90, मटकी-95 ते 100, फुटाणाडाळ- 85. 

go to top